CWG 2022 Day 5, Schedule : राष्ट्रकुल स्पर्धेचा आज पाचवा दिवस, कोणत्या खेळात पदकांची आशा, आजचं वेळापत्रकही जाणून घ्या…

| Updated on: Aug 02, 2022 | 9:31 AM

वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी कायम आहे. आज महिलांच्या 76 किलोमध्ये पूनम यादव, पुरुषांच्या 96 किलोमध्ये विकास ठाकूरकडून अपेक्षा आहे. पूनमचा सामना दुपारी 2 वाजता होईल. विकासचा सामना सं 6.30 वाजता सुरू होईल.

1 / 5
कॉमनवेल्थ गेम्स 2022च्या 5 व्या दिवशी म्हणजे लॉन बॉल्समध्ये सुवर्ण इतिहास रचण्याचा भारताचा मानस आहे. त्याचबरोबर वेटलिफ्टिंगमध्ये आणखी पदकांचा वर्षाव होऊ शकतो. भारतानं आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्य पदके जिंकली आहेत. याशिवाय जलतरण, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, हॉकीमध्येही भारताची ताकद पाहायला मिळणार आहे.

2 / 5
कॉमनवेल्थ गेम्सच्या पाचव्या दिवशी लॉन बॉल्समध्ये सुवर्णपदकासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. याआधी राष्ट्रकुलमध्ये भारताला लॉन बॉलमध्ये कोणतेही पदक मिळाले नव्हते. दुपारी एक वाजता सामना सुरू होईल.

3 / 5
वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी कायम आहे. मंगळवारी महिलांच्या 76 किलोमध्ये पूनम यादव, पुरुषांच्या 96 किलोमध्ये विकास ठाकूरकडून संपूर्ण देशाला अपेक्षा आहे. पूनमचा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि विकासचा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.

4 / 5
भारताचा स्टार जलतरणपटू श्रीहरी नटराज 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत आव्हान देईल. त्याचवेळी नटराज दुपारी 3 वाजता पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक हीटमध्ये उतरेल. बॅडमिंटन मिश्र संघाचा अंतिम सामनाही होणार आहे, मात्र त्याआधी भारताला सिंगापूरवर मात करावी लागणार आहे.

5 / 5
मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनास पुरुषांच्या लांब उडी पात्रता फेरी A आणि B मध्ये दुपारी 2.30 वाजता स्पर्धा करतील. बॉक्सिंगमध्ये आशिष कुमार पुरुषांच्या 75 किलोपेक्षा जास्त वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत आव्हान देईल. हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला संध्याकाळी 6.30 वाजता गट सामन्यात इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.