CWG 2022, IND vs AUS : भारतीय महिला क्रिकेट संघाचं सुवर्णस्वप्न भंगलं! फायनलमध्ये रंगतदार लढत, अवघ्या 9 धावांनी भारताचा पराभव

CWG 2022, IND vs AUS : प्रथमच CWG मध्ये समाविष्ट महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने सुवर्ण, भारताने रौप्य आणि न्यूझीलंडने कांस्यपदक जिंकले आहे. यजमान इंग्लंड रिकाम्या हाताने परतले. याविषयी सविस्तर वाचा...

CWG 2022, IND vs AUS : भारतीय महिला क्रिकेट संघाचं सुवर्णस्वप्न भंगलं! फायनलमध्ये रंगतदार लढत, अवघ्या 9 धावांनी भारताचा पराभव
महिला क्रिकेट संघाचं सुवर्णस्वप्न भंगलं, भारताने रौप्य जिंकलं
Image Credit source: tv9
शुभम कुलकर्णी

|

Aug 08, 2022 | 6:36 AM

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) महिला क्रिकेटचा पहिला चॅम्पियन ठरला आहे . रविवारी एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात T20 विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियानं (IND vs AUS) रोमहर्षक सामन्यात भारताचा 9 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियानं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. ऑस्ट्रेलियाकडून टी-20 फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा पराभूत झालेल्या भारतीय संघानं (womens cricket team) रौप्यपदक पटकावलं. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 162 धावांच्या लक्ष्यासमोर भारतीय संघ 152 धावांवरच गारद झाला आणि पुन्हा एकदा भारतीय संघ अंतिम फेरीत येऊन जेतेपदापासून वंचित राहिला. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर रविवारी 7 ऑगस्टला झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टार सलामीवीर बेथ मुनीचं (61) उत्कृष्ट अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंग (36) सोबतची मोठी भागीदारी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 8 गडी गमावून 161 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांची चुरशीची कामगिरी आणि राधा यादव आणि दीप्ती शर्मा यांच्या अप्रतिम झेलांमुळं भारतानं ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येसह रोखलं आणि विजयी लक्ष्य स्वत:साठी तयार केले.

ऑस्ट्रेलियानं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं

हरमनप्रीत-जेमिमाची भक्कम भागीदारी

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. ग्रुप स्टेज आणि सेमीफायनलमध्ये स्फोटक इनिंग्स खेळणारी सलामीवीर स्मृती मानधना यावेळी स्वस्तात सेटल झाली. तर शेफाली वर्माही फार काळ टिकली नाही. अवघ्या 22 धावांवर 2 विकेट गमावणाऱ्या भारतीय संघाला मोठ्या आणि वेगवान भागीदारीची गरज होती. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी ही जबाबदारी पार पाडली. रॉड्रिग्जने सावकाश खेळणे सुरू ठेवले, पण एका टोकापासून आघाडी रोखून धरली, तर कॅप्टन कौरने आपली आक्रमक शैली दाखवत राहिली.

भारताला रौप्यपदक

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरेख अर्धशतक झळकावणा-या हरमनप्रीतने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवली आणि अवघ्या 33 चेंडूत अर्धशतक झळकावले.

एकामागून एक विकेट

जेमिमा आणि हरमनप्रीत कौर यांच्यातील भागीदारीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि सामना भारताच्या झोतात येईल, असं वाटत होतं. पण नंतर तेच घडलं. जे 2017 च्या विश्वचषक फायनलमध्ये घडलं. एकामागून एक विकेट पडत होत्या. 15व्या षटकात जेमिमाच्या विकेटसह 96 धावांची भागीदारी तुटली आणि त्यानंतर पुढच्या 7 चेंडूत पूजा वस्त्राकर आणि कर्णधार हरमनप्रीत कौरही पॅव्हेलियनमध्ये परतल्या.

2017 च्या वेदना ताज्या

सततच्या धक्क्यांमधून भारतीय संघ सावरू शकला नाही. दीप्ती शर्माने प्रयत्न केला. पण तीही फार काळ टिकू शकली नाही. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची गरज होती. परंतु भारतीय संघ केवळ 1 धाव करू शकला आणि संपूर्ण संघ अवघ्या 152 धावांवर आटोपला. अशाप्रकारे 2017 सारख्या विजेतेपदाच्या जवळ येऊन भारतीय संघ पुन्हा एकदा हरला. तेव्हाही भारताचा 9 धावांनी पराभव झाला होता आणि यावेळीही. ऑस्ट्रेलियाच्या सुवर्ण आणि भारताच्या रौप्यशिवाय न्यूझीलंडने कांस्यपदक जिंकले. त्याचवेळी विजेतेपदाचा मोठा दावेदार असलेल्या यजमान इंग्लंडला रिकाम्या हाताने परतावे लागले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें