AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWC 2022 : IND vs AUS Final सामन्यात मोठा निष्काळजीपणा, कोरोनाबाधित ऑस्ट्रेलियन खेळाडूला खेळण्याची परवानगी

ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, ताहलिया मॅकग्राला राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि आयसीसीनं खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे तिचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

CWC 2022 : IND vs AUS Final सामन्यात मोठा निष्काळजीपणा, कोरोनाबाधित ऑस्ट्रेलियन खेळाडूला खेळण्याची परवानगी
ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्रामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. मात्र, तरीही तिला संघात ठेवण्यात आलंय.Image Credit source: social
| Updated on: Aug 07, 2022 | 11:01 PM
Share

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील राष्ट्रकुल महिला क्रिकेट स्पर्धेच्या (CWC 2022) अंतिम सामन्यात कोरोना (Corona) संसर्गाचं प्रकरण समोर आलं आहे. सामन्याच्या मध्यंतरी ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राला कोरोना संसर्ग झाल्याची बातमी समोर आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे असं असतानाही तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करून खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्राला सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं पण, तिला राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि आयसीसीनं खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे तिचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला, असं निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे इतर खेळाडूंना देखील कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

फायनलमध्ये मोठा निष्काळजीपणा

चॅम्पियन कोण असेल हे ठरविण्याचा दिवस

प्रथमच या खेळांमध्ये समाविष्ट असलेल्या महिला T20 क्रिकेटचा पहिला चॅम्पियन कोण असेल हे ठरविण्याचा दिवस आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय क्रिकेट संघही सुवर्णपदकाच्या दावेदारात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर सुरू आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

14 वर्षांनंतर….

कॉमनवेल्थ गेम्समध्ये 14 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. याआधी, 1998 मध्ये प्रथम आणि एकमेव क्रिकेट खेळले गेले होते, परंतु नंतर त्यात पुरुषांच्या एकदिवसीय स्वरूपाचा समावेश करण्यात आला. 1998 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता, मात्र ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

अशी भारताची कामगिरी होती

आता पुन्हा एकदा क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. फॉरमॅट वेगळा आहे, पण ऑस्ट्रेलिया पुन्हा फायनलमध्ये आहे. फरक हा आहे की यावेळी भारतही या फायनलचा भाग आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी दमदार राहिली आहे. संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्याला पहिल्या सामन्यातच भारताकडून सर्वात मोठे आव्हान मिळाले होते, मात्र त्यानंतर टीम इंडियाने विजयाची संधी गमावली. मात्र, यानंतर भारताने पुनरागमन करत उपांत्य फेरीत पाकिस्तान, बार्बाडोस आणि त्यानंतर यजमान इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून सुवर्णपदकाच्या लढाईत आपले नाव कोरले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.