AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022 Medal Tally : राष्ट्रकुल स्पर्धेत कुणाची आगेकूच, भारताला किती पदके? जाणून घ्या…

ऑस्ट्रेलियानं आपलं पहिलं स्थान कायम राखलं असून सर्वाधिक 46 सुवर्ण जिंकले आहेत. यापैकी त्यांना फक्त जलतरणातून 25 सुवर्ण मिळाले आहेत. तर भारतासह इतर देश कोणत्या स्थानी, हे जाणून घ्या...

CWG 2022 Medal Tally : राष्ट्रकुल स्पर्धेत कुणाची आगेकूच, भारताला किती पदके? जाणून घ्या...
ऑस्ट्रेलियानं राष्ट्रकुलमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखलंImage Credit source: social
| Updated on: Aug 04, 2022 | 7:08 AM
Share

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधून (CWG 2022)  भारतासाठी सातत्यानं चांगली बातमी येत आहे . सुरुवातीच्या काळात वेटलिफ्टिंगमध्ये झेंडा रोवल्यानंतर भारतानं (India) इतर खेळांमध्येही पदकांची कमाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम भारताच्या पदकांच्या वाढत्या संख्येच्या (CWG 2022 Medal Tally) रूपात पदकतालिकेत दिसून येतंय. आता जिथं सहा दिवसांनंतर भारताच्या खात्यात 18 पदके आली. मात्र, यावेळी अधिक पदके असूनही भारताच्या क्रमवारीत सुधारणा होण्याऐवजी किंचित तोटाच झाला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे. बुधवार, 3 ऑगस्टला भारतानं पुन्हा वेटलिफ्टिंगमध्ये (CWG 2022 Weightlifting) आपली उत्कृष्टता दाखवली आणि 2 कांस्य पदकं जिंकली. भारतानं आपलं खातं उघडलेल्या इतर खेळांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली. अनुभवी सौरव घोषालने स्क्वॉशमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. हे भारताचं राष्ट्रकुच्या इतिहासातील पहलं एकेरी पदक आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये उंच उडीपटू तेजस्वीन शंकरनेही कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. याशिवाय ज्युदोमध्येही विशेष यश मिळाले असून, तुलिका मानने रौप्यपदक जिंकून छाप पाडली.

भारताचे नुकसान

अशाप्रकारे बुधवारी भारतानं एकूण 5 पदके जिंकून भारताच्या पदकांची संख्या 18 वर नेली. देशाच्या नावावर सध्या 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्य पदके आहेत. एका दिवसापूर्वी 5 पदके जिंकूनही भारतीय संघ सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. हे घडले कारण स्कॉटलंडने एकाच दिवसात एकूण 4 सुवर्णपदके जिंकून भारत आणि दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले. स्कॉटलंडकडे आता 7 सुवर्णपदके आहेत आणि त्यामुळे तो पाचव्या स्थानावर गेला आहे.

46 सुवर्णांसह एकूण 123 पदके

ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम असून त्याच्या खात्यात 46 सुवर्णांसह एकूण 123 पदके आहेत. जलतरणाने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक यश मिळवून दिले.जलतरणाच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 सुवर्णांसह एकूण 9 पदके जिंकली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने जलतरणपटूंच्या मदतीने 25 सुवर्णांसह एकूण 65 पदके जिंकली. तथापि, इंग्लंडने आता ऑस्ट्रेलियासोबतचे अंतर कमी केले आहे आणि दुसऱ्या स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. आतापर्यंत 32 देशांच्या खात्यात पदके जमा झाली असून त्यात 158 सुवर्णांसह 486 पदके वितरीत करण्यात आली आहेत.

स्क्वॉशमध्ये भारतासाठी कांस्यपदक

भारतानं आपलं खातं उघडलेल्या इतर खेळांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली. अनुभवी सौरव घोषालने स्क्वॉशमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. हे भारताचं राष्ट्रकुच्या इतिहासातील पहलं एकेरी पदक आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये उंच उडीपटू तेजस्वीन शंकरनेही कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. याशिवाय ज्युदोमध्येही विशेष यश मिळाले असून, तुलिका मानने रौप्यपदक जिंकून छाप पाडली.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.