CWG 2022: वेल डन Lakshya sen, बॅडमिंटन मध्ये भारताला मिळालं दुसरं गोल्ड मेडल

| Updated on: Aug 08, 2022 | 5:40 PM

पी.व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनने भारतासाठी गोल्ड मेडल विजेती कामगिरी केली आहे. बॅडमिंटन मध्ये हे आजच्या दिवसातील दुसरं गोल्ड मेडल आहे.

CWG 2022: वेल डन Lakshya sen, बॅडमिंटन मध्ये भारताला मिळालं दुसरं गोल्ड मेडल
Lakshya sen
Follow us on

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya sen) कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मध्ये आपल्यातील कौशल्य, प्रतिभा दाखवून दिली. पुरुष एकेरीच्या फायनल मध्ये त्याने मलेशियाच्या एनजी त्झे योंग वर विजय मिळवला. या विजयासह त्याने गोल्ड मेडलही जिंकलं. एनजी त्झे योंगने किदांबी श्रीकांतला (Srikanth Kidambi) हरवून फायनल मध्ये प्रवेश केला होता. लक्ष्य सेनने या विजयासह भारतीय खेळाडूच्या पराभवाचा एकप्रकारे बदला घेतला. लक्ष्य सेन पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खेळत होता. पहिल्याच कॉमनवेल्थ मध्ये त्याने दमदार कामगिरी केली.

सेनने पहिला गेम गमावला, नंतर जबरदस्त कमबॅक

फायनल मध्ये लक्ष्य सेनने खराब सुरुवात केली. त्याने पहिला गेम 19-21 असा निसत्या फरकाने गमावला. दुसऱ्या गेम मध्येही तो 6-8 ने पिछाडीवर होता. पण त्यानंतर त्याने आपल्या खेळाचा स्तर कमालीचा उंचावला. त्याने दुसरा गेम 21-9 असा जिंकला. तिसऱ्या गेम मध्ये सेनने पुन्हा मलेशियन खेळाडूवर दबाव वाढवला. अखेरीस लक्ष्य सेन विजयी झाला. सेनने तिसरा गेम 21-16 असा जिंकला.

लक्ष्य सेन भारताचं भविष्य

अवघ्या 20 वर्षाच्या लक्ष्य सेनने आपल्या छोट्याशा करीयरमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये या खेळाडूने मिक्स्ड इवेंट मध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी केली. आता एकेरीत गोल्ड मेडल जिंकण्यात यशस्वी ठरला. लक्ष्य सेनने यावर्षी थॉमस कप स्पर्धेतही टीम इंडियासाठी सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 मध्ये ब्राँझ मेडल जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याशिवाय आशियाई ज्यूनियर चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड आणि ब्राँझ पदक विजेती कामगिरी केली आहे. यूथ ऑलिम्पिक मध्ये लक्ष्यने गोल्ड मेडल विजेती कामगिरी केलीय.