CWG 2022: सात्विक-चिराग जोडी बनली चॅम्पियन, बॅडमिंटन मध्ये भारताची गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक

भारताने कॉमनवेल्थ गेम्सच्या अखेरच्या दिवशी बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

CWG 2022: सात्विक-चिराग जोडी बनली चॅम्पियन, बॅडमिंटन मध्ये भारताची गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक
Sairaj-chirag
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 6:50 PM

मुंबई: भारताने कॉमनवेल्थ गेम्सच्या (CWG 2022) अखेरच्या दिवशी बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. महिला एकेरीत पी.व्ही.सिंधु, त्यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, त्यानंतर सात्विक साईराज रँकीरेड्डी (satwik sairaj rankireddy) आणि चिराग शेट्टी (chirag shetty) जोडीने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे. भारताच्या नंबर 1 जोडीने इंग्लंडच्या लेन आणि वेंडी जोडीवर विजय मिळवला. भारताच पुरुश दुहेरीतील हे गोल्ड मेडल आहे. याआधी या जोडीने 2018 मध्ये रौप्य पदक विजेती कामगिरी केली होती.

45 मिनिटात जिंकलं गोल्ड

सात्विक आणि चिराग जोडीने 45 मिनिट चाललेल्या सामन्यात 21-15, 21-13 असा सामना जिंकला. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने बॅडमिंटन मध्ये तीन गोल्ड मेडल्स मिळवली आहेत. सात्विक-चिराग जोडीने शानदार प्रदर्शन केलं. त्यांना पदकासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. चिराग शेट्टी आणि सात्विकची जोडी याआधी दोनदा इंग्लंडच्या जोडीला भिडली होती. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला होता. वर्ष 2019 मध्ये डेन्मार्क ओपन मध्ये इंग्लंडची जोडी जिंकली होती. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सात्विक-चिरागने सामना जिंकला होता.

भारताने सरळ गेम्स मध्ये जिंकलं मेडल

पहिल्या गेम मध्ये भारतीय जोडीने नेटजवळ पकड मिळवली. त्यामुळे विजय मिळवण्यात त्यांना अडचण आली नाही. दुसऱ्या गेम मध्ये यजमानांनी पुनरागमन केलं. मॅच रोमांचक वळणार चालली होती. वेंडीने ड्रॉप शॉट्स खेळून भारतीय जोडीला हैराण केलं. पण त्याला सात्विक-चिराग जोडीवर आघाडी मिळवता आली नाही. ब्रेक पर्यंत भारताने 16-11 अशी आघाडी मिळवली होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागली नाही.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.