Virat Kohli : आऊट की नॉट आऊट ? विराटच्या ‘त्या’ विकेटवरून नवा वाद, रोहित शर्माही…

विराट कोहली आऊट होता की नॉट आऊट... अंपायरच्या त्या निर्णयाने नव्या वादाला आता तोंड फुटलं आहे. यामुळे क्रिकेट जगत आता दोन गटांत विभागलं गेलं. एक वेळ तर अशी आली की पॅव्हेलियनमध्ये बसलेला रोहित शर्माही स्वत:ला रोखू शकला नाही.

Virat Kohli : आऊट की नॉट आऊट ? विराटच्या त्या विकेटवरून नवा वाद, रोहित शर्माही...
विराटच्या विकेटवरून नवा विवाद
Image Credit source: X
| Updated on: Jan 03, 2025 | 9:13 AM

भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज आणि वादांचं जुनं नातं दिसतंय. ही सीरिज सुरू होताच नवनव्या विवादानांही सुरूवात होते. सिडनीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती . 5 व्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीला आऊट न दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. खरंतर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगसाठी आलेला विराट कोहली हा आऊट होता-होता थोडक्यात वाचला. भारतीय संघाची फलंदाजी सुरू अताना 8 व्या शतकात स्कॉट बॉलेंडच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने विराटचा कॅच पकडला. मात्र टीव्ही अंपायरने रिव्ह्यू घेतल्यानंतर तो कॅच नसल्याचा निर्वाळा दिला आणि नव्या वादाला तोंड फुटलं.

विराटच्या विकेटवरून विवाद

तेव्हा विराट आऊट होता की नॉट आऊट.. अंपायरच्या त्या निर्णयनानंतर वाद सुरू झाला आहे, क्रिकेट जगतही दोन गटांत विभागलं गेलं. सुनील गावस्कर, इरफान पठाण यांसारख्या भारतच्या दिग्गज क्रिकेटर्सचं असं म्हणणं आहे की कोहली नॉट आऊट होता, तर मायकल वॉन, जस्टिन लँगर यांच्यासारख्या विदेशी खेळांडूच्या मतानुसार, विराट बाद झाला होता.

 

कोहलीबाबत अंपायरच्या निर्णयावर दिग्गजांचं म्हणणं काय ?

भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांच्या मतानुसार, तो चेंडू जमिनीला लागल्याने अंपायरने कोहलीला नॉट आउट दिले. मात्र, लँगर आणि वॉन हे या मताशी सहमत नाही. लँगरच्या म्हणण्यानुसार, कोहली बाद झाल्याचे त्याने स्पष्टपणे पाहिले. स्टीव्ह स्मिथचे बोट चेंडूखाली ( लागले) होते, म्हणजेच चेंडू जमिनीला लागला नव्हता ( त्यामुळे कोहली आऊट होता) असं त्याचं मत आहे.

 

रोहित शर्माही बेचैन

पहिल्याच चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला तेव्हा पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या रोहित शर्माच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. टीव्ही अंपायर जेव्हा त्या कॅचचा रिव्ह्यू करत होते तेव्हा रोहितच्या चेहऱ्यावर दिसणारा तणाव स्पष्टपणे जाणवत होता. सध्या तो सिडनी कसोटी सामन्यात खेळत नसला तरी विराटच्या विकेटमुळे तो बेचैन होता, हे जाणवलं. एका वादग्रस्त निर्णयामुळे विराट कोहलीला सिडनी कसोटीत जीवनदान मिळाले. मात्र आता त्यावर सुरू असलेला वाद कधी शमणार हे काही स्पष्ट नाही.