T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेच्या पात्रता फेरीची तयारी आता सुरू झाली आहे. दोन वर्षांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. यासाठी आधीच 12 संघ ठरले आहेत. तर उर्वरित 8 संघांची निवड पात्रता फेरीतून होणार आहे.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार
T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 18, 2026 | 10:34 PM

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. त्यापैकी 12 संघ आधीच ठरले आहेत. तर उर्वरित आठ संघ पात्रता फेरीतून ठरणार आहेत. उर्वरित आठ संघांसाठी पात्रता फेरी आयोजित केली जाईल, असे आयसीसीने जाहीर केले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खराब कामगिरी करून पहिल्याच फेरीत बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलियाची थेट निवड झाली आहे. 2028च्या टी20 विश्वचषकासाठी यजमान देश म्हणून थेट निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलंडदेखील आगामी टी20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे त्यांना स्पर्धेसाठी थेट एन्ट्री मिळाली आहे. 2026च्या वर्ल्डकपमधील कामगिरीच्या जोरावर भारत, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे पात्र ठरले आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना रँकिंगच्या आधारे तिकीट मिळालं आहे.

वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळले तरी पात्र नाही, आता…

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळलेले अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया, नेपाळ, ओमान, संयुक्त अरब अमिराती, इटली आणि कॅनडा यांना थेट एन्ट्री मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना या स्पर्धेत एन्ट्री घेण्यासाठी पात्रता फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. पात्रता फेरीत आशियातून 2, अफ्रिकेतून 2, युरोपमधून 2, अमेरिका खंडातून 1 आणि पू्र्व आशिया पॅसिफिकमधून 1 संघाची निवड केली जाणार आहे. स्थानिक स्तरावर मार्च 2026 पासून सामने सुरू झाले आहेत. नवख्या देशांचे संघ यात आपापसात राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळतात.या स्पर्धांमधून अव्वल कामगिरी करणारे संघ पुढच्या टप्प्यासाठी निवडले जातात. या टप्प्यातून यशस्वी ठरणारे एकूण 8 संघ शेवटच्या मुख्य पात्रता फेरीत पोहोचतील.

टी20 वर्ल्डकप 2028 नवा फॉर्मेट

आयसीसीने टी20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 21 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2028 या कालावधीत खेळवला जाण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी फॉर्मेटमध्ये बदल केला आहे. यापूर्वी वर्ल्डकप स्पर्धेत सुपर 8 फेरी होती, त्यात बदल करून सुपर 10 फेरी लागू करण्यात आली आहे. स्पर्धेत 20 संघ खेळणार आहेत. पण यावेळी चार संघांचे पाच गट असतील. प्रत्येक गटातून दोन संघ पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर 10 मध्ये करतील. सुपर 10 मध्ये 5-5 चे दोन गट असतील.’सुपर 10′ च्या दोन्ही गटांतील नंबर 1 वर राहणारे 2 संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. उर्वरित २ जागांसाठी दोन ‘एलिमिनेटर’ सामने खेळवले जातील.

Follow Us