सचिन की विराट..! कसोटी क्रिकेटमध्ये कोण बेस्ट? एबी डिव्हिलियर्सच्या विश्लेषणात किती तथ्य? जाणून घ्या

एबी डिविलियर्सने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची कसोटी क्रिकेटमधील केलेली तुलना चर्चेत आहे. विराट कोहली सचिनपेक्षा सरस असल्याचं मत त्याने मांडलं. खासकरून विदेशी भूमीवर विराट बेस्ट असल्याचं सांगितलं. चला जाणून घेऊयात यात किती तथ्य आहे ते..

सचिन की विराट..! कसोटी क्रिकेटमध्ये कोण बेस्ट? एबी डिव्हिलियर्सच्या विश्लेषणात किती तथ्य? जाणून घ्या
सचिन की विराट..! कसोटी क्रिकेटमध्ये कोण बेस्ट? एबी डिविलियर्सचं विश्लेषणात किती तथ्य? जाणून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 20, 2026 | 7:32 PM

क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम रचले जातात आणि कालांतराने मोडलेही जातात. सचिन तेंडुलकरने क्रिकेटचा एक काळ गाजवला. त्याच्या नावावर आजही अनेक विक्रम आहेत. सचिनचा काळ संपल्यानंतर विराट कोहलीचं पर्व सुरू झालं. त्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यामुळे त्या त्या काळात क्रिकेटपटूंसाठी सुवर्णकाळ ठरला आहे. पण या दोन दिग्गज खेळाडूंची तुलना दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा सरस असल्याचं म्हणणं त्याने मांडलं आहे. एबी डिविलियर्सच्या या तुलनेमुळे भारतीय क्रीडाप्रेमी थोडे नाराज झाले आहे. त्यांना त्याचं म्हणणं काही रूचलेलं नाही. पण एबी डिव्हिलियर्सने कोणत्या तथ्यांच्या आधारावर हे म्हणणं मांडलं? त्याचं म्हणणं योग्य की अयोग्य ते आकडेवारीतून जाणून घेऊयात…

विदेशी भूमीत सचिन तेंडुलकरचं नाणं खणखणीत

कसोटी क्रिकेटमध्ये विदेशी भूमीवर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या आकडेवारीत फार अंतर आहे. सचिन तेंडुलकर आकडेवारीच्या तुलनेत विराट कोहलीच्या पुढे आहे. सचिन तेंडुलकरने 176 डावात 54.74 च्या सरासरीने 8705 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने विदेशातील 119 डावात 41.5 च्या सरासरीने 4774 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातही सचिन तेंडुलकर विराट कोहलीच्या पुढे आहे. सेना देश अर्थात दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकरचं नाणं खणखणीत वाजलं आहे. सचिनने ऑस्ट्रेलियात 53.20 च्या सरसरीने 1809 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 46.72 च्या सरासरीने 1542 धावा केल्या आहेत.

इंग्लंडमध्ये सचिन तेंडुलकरने 54.31 च्या सरासरीने 1575 कसोटी धावा, तर विराट कोहलीने 33.21 च्या सरासरीने 1096 धावा केल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेत सचिनने 46.44 च्या सरासरीने 1161 धावा, तर विराट कोहलीने 49.5 च्या सरासरीने 891 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये सचिनने 49.52 च्या सरासरीने 842 धावा, तर विराट कोहलीने 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या आहे. त्यामुळे आकडेवारीत विराट कोहलीपेक्षा सचिनच सरस आहे. त्यामुळे एबी डिव्हिलियर्सचं म्हणणं फार तर त्याचं वैयक्तिक मत असू शकतं. हा प्रश्न खुद्द विराट कोहलीला विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल हे सांगायला नको. पण सध्या तरी एबी डिव्हिलियर्स म्हणण्यात काही तथ्य नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us