AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SL : ऑस्ट्रेलिया श्रीलंका सामन्यादरम्यान अपघात टळला! तसं झालं असतं तर…Watch Video

AUS vs SL, World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने काही काळ सामना थांबवावा लागला होता. या आधी धुळीचे लोट उठले होते. सुदैवाने प्रेक्षकांनी पळ काढला नाही तर...

AUS vs SL : ऑस्ट्रेलिया श्रीलंका सामन्यादरम्यान अपघात टळला! तसं झालं असतं तर...Watch Video
वादळ वारा सुटला गं..! ऑस्ट्रेलिया श्रीलंका सामन्यात धुळीचे लोट, अपघात होई असं वाटताच प्रेक्षकांची पळापळ Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 16, 2023 | 8:30 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सुरु आहे.उत्तर प्रदेशातील लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये हा सामना सुरु आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना काही काळ थांबवावा. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. पण सामना सुरु असताना धुळीचं वादळ उठलं. यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला अडचण झाली. श्रीलंकेचा डाव सुरु असताना 43 व्या षटकात अशी स्थिती निर्माण झाली. वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की, स्टेडियममधील होर्डिंग खाली पडलं.

सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी वेळीच संकट ओळखलं आणि तेथून पळ काढला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षक स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या डोळ्यात धूळ गेल्याने अस्वस्थ झाले होते.

श्रीलंकेचा संपूर्ण संघ 43.3 षटकात 209 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं आहे. पाथुम निसांका आणि कुसल परेरा यांची चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 125 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. 75 धावांमध्ये दहा गडी बाद झाले. एडम झाम्पाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. तर ग्लेन मॅक्सवेलला 1 गडी बाद करण्यात यश आलं. पाथुम निसांकाने 61, तर कुसल परेरा याने 78 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.

Follow Us
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ