6,6,6,6,6,6, इब्राहिम झाद्रानचा तडाखा, इंग्लंडविरुद्ध 6 सिक्स आणि 5 रेकॉर्ड

Ibrahim Zadran Records : इब्राहीम झाद्रान याने इंग्लंडविरुद्ध 177 धावांची खेळी केली. इब्राहीमने या खेळीसह अफगाणिस्तानला सामन्यात फ्रन्ट फुटवर आणून ठेवलं. तसेच इब्राहीमने या खेळीसह 5 रेकॉर्ड्स केले.

6,6,6,6,6,6, इब्राहिम झाद्रानचा तडाखा, इंग्लंडविरुद्ध 6 सिक्स आणि 5 रेकॉर्ड
Afghanistan Ibrahim Zadran Century
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 26, 2025 | 8:16 PM

अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहीम झाद्रान याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रेकॉर्ड्सची रांग लावली. इब्राहीमने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये 177 धावांची खेळी विक्रमी केली. इब्राहीमने या खेळीत 12 चौकारांसह 6 षटकार लगावले. इब्राहीमने केलेल्या या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने 325 धावांपर्यंत मजल मारली. इब्राहीमने या खेळीसह 5 मोठे विक्रम केले. इब्राहीमने नक्की कोणते विक्रम केलेत? जाणून घेऊयात.

सर्वोच्च वैयक्तिक धावा

इब्राहीम चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. इब्राहीमने इंग्लंडच्या बेन डकेट याचा रेकॉर्ड ब्रेक केला. बेन डकेट याने काही दिवसांआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावांची खेळी केली होती. तर इब्राहीमने डकेटच्या पुढे जात 177 धावा केल्या आहेत.

चौथा फलंदाज

इब्राहीम या खेळीसह पाकिस्तानमध्ये सर्वोच्च धावासंख्या करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. इब्राहीमआधी गॅरी कर्स्टन, विव रिचर्ड्स आणि फखर झमान या तिघांनी ही कामिगरी केली आहे.

सर्वाधिक शतकं करणारा दुसरा अफगाणि

इब्राहीमने इंग्लंडविरुद्ध केलेलं शतक हे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील सहावं शतक ठरलं. इब्राहीम यासह अफगाणिस्तानकडून सर्वाधिक शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक 8 एकदिवसीय शतकांचा विक्रम हा रहमानुल्लाह गुरुबाज याच्या नावावर आहे.

अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय सरासरी

इब्राहीम 50 च्या सरासरीने धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इब्राहीमची सरासरी इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी 47 इतकी होती. इब्राहीमने 35 एकदिवसीय डावांमध्ये 51.06 च्या सरासरीने 1 हजार 634 धावा केल्या आहेत.

इब्राहीम झाद्रान याची विक्रमी खेळी

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.