
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने जबरदस्त सुरुवात केली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत केलं आहे. भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. पण अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 134 धावांवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने विकेट घेतली आणि अफगाणिस्तानचा डाव आटोपला. या विजयासह टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील दुसरा सामना हा 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत केलं आहे. यामुळे दोन गुणांसह नेट रनरेटही चांगला झाला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग आणखी सोप झाला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.
अर्शदीप सिंगने राशीद खाननंतर फलंदाजीसाठी आलेल्या नवीन उल हकला बाद केलं आहे. त्याचं हॅटट्रीक घेण्याचं स्वप्न मात्र भंगलं.
अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर राशीद खान बाद झाला आहे. रवींद्र जडेजाने त्याचा सोपा झेल घेतला.
अफगाणिस्तानने सहावी विकेट गमावली आहे. नजीबुल्लाह झद्रान 17 बॉलमध्ये 19 धावा केल्या.
अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. अझमतुल्लाह ओमरझई आऊट झाला आहे. ओमरझईने 20 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली.
अफगाणिस्तानने चौथी विकेट गमावली आहे. गुलबदीन नईब 21 बॉलमध्ये 17 धावा करुन आऊट झाला.
जसप्रीत बुमराह याने हजरतुल्लाह झझई याला आऊट करत अफगाणिस्तानला तिसरा धक्का दिला आहे. झझईने 4 बॉलमध्ये 2 धावा केल्या. बुमराहची ही दुसरी विकेट ठरली.
अफगाणिस्तानने दुसरी विकेट गमावली आहे. इब्राहिम झद्रान कॅच आऊट होऊन माघारी परतला आहे. इब्राहिम झद्रानने 11 बॉलमध्ये 8 धावा केल्या.
जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला आहे. बुमराहने रहमानउल्लाह गुरुबाज याला ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. गुरुबाजने 8 बॉलमध्ये 11 धावा केल्या.
टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने 53 आणि हार्दिक पंड्याने 32 धावांची खेळी केली. तर अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि फझलहक फारुकी या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. रवींद्र जडेजा आऊट 7 धावा करुन माघारी परतला आहे.
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. उपकर्णधार हार्दिक पंड्या 24 बॉलमध्ये 32 धावा करुन कॅच आऊट झाला.
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव 28 बॉलमध्ये 53 धावा करुन आऊट झाला आहे.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. शिवम दुबे एलबीडबल्यू आऊट झाला आहे. शिवमने 7 बॉल 10 रन्स केल्या.
टीम इंडियाने तिसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. रोहित, ऋषभनंतर आता विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 24 बॉलमध्ये 24 धावा केल्या. टीम इंडियाचा स्कोअर हा 8.3 ओव्हरनंतर 3 आऊट 62 असा झाला आहे.
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत 11 बॉलमध्ये 20 धावा करुन आऊट झाला आहे. अफगाणिस्तान कॅप्टन राशिद खान याने ऋषभला एलबीडबल्यू आऊट केलं
टीम इंडियाने पावर प्लेच्या पहिल्या आणि एकूण 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 47 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 19 आणि विराट कोहली 17 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर कॅप्टन रोहित शर्मा 13 बॉलमध्ये 8 धावा करुन माघारी परतला.
टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 13 बॉलमध्ये 8 धावा करुन कॅच आऊट झाला आह.
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील पहिला सामना आहे.
राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झझई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.
रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
टीम इंडियाने सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. मोहम्मद सिराज याच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे. तर अफगाणिस्तानने करीम जनात याच्या जागी हजरतुल्ला झझई याचा समावेश केला आहे.
टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध अजिंक्य आहे. टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात 8 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत. सुपर 8 ए ग्रुपमधील या संघांचा हा पहिला सामना आहे. सुपर 8 मध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत आयर्लंडला पराभूत करत विजयाने सुरुवात केली. तर अफगाणिस्ताननेही युगांडावर मात करत विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे आता सुपर 8फेरीत दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.