AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनंतर बारामतीचा आमदार कोण, पोटनिवडणुकीबाबत सर्वात मोठी माहिती समोर; सुनेत्रा पवार यांना थेट…

अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवणार आहेत.

अजितदादांनंतर बारामतीचा आमदार कोण, पोटनिवडणुकीबाबत सर्वात मोठी माहिती समोर; सुनेत्रा पवार यांना थेट...
sunetra pawar and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 25, 2026 | 5:54 PM
Share

Baramati By Election : अजितदादा यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अजितदादा या मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बारामतीमध्ये अनेक विकासकामे झाली. परंतु आता अजितदादा हयात नसल्याने या मतदारसंघाचा नवा आमदार कोण होणार? असे विचारले जात होते. अजितदादा यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. असे असतानाच आता या पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष बारामती मतदारसंघातून कोणाला उभे करणार? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्षाच्या मोठ्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच उभे करण्यावर एकमत झालेले आहे. म्हणजेच आता सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आता सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहातचे सदस्य व्हावे लागेल. त्यामुळेच सुनेत्रा पवार यांना पक्षातर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहे.

बिनविरोध निवडणुकीचे संकेत

दुसरीकडे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. बारामती विधानसभा मतदासंघाची प्ररूप मतदार यादी 10 मार्च रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर कोणत्याही क्षणी पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना बारामतीची पोटनिवडणूक ही अर्थात बिनविरोध होईल. अजितदादा गेल्यानंतर ही निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात सुसंस्कृत आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल याबाबत मला तिळमात्र शंका नाही, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीदेखील महाविकास आघाडीचे घटकपक्ष एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतर याबाबतची भूमिका आम्ही जाहीर करू, असे सांगितले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?