
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत न्यूझीलंड, टीम इंडियानंतर आता दक्षिण आफ्रिकेने विजयी सुरुवात केली आहे. बी ग्रुपमधील या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 107 धावांनी विजय मिळवलाय. अफगाणिस्तानला विजयासाठी 316 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र अफगाणिस्तानला रडतखडत 200 पार पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 43.3 ओव्हरमध्ये 208 धावांवर रोखलं. अफगाणिस्तानसाठी रहमत शाह याने एकट्याने झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. रहमत व्यतिरिक्त अफगाणिस्तानकडून एकालाही 20 पार मजल मारता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विजयी आव्हानासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानला ठराविक सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या एकाही जोडीला मैदानात टिकून मोठी भागीदारी करु दिली नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा डाव हा 208 धावावंर आटोपला. रहमत शाह याने एक बाजू लावून धरली मात्र त्याला एकाही फलंदाजाला साथ देता आली नाही. रहमतने 92 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 9 फोरसह 90 रन्स केल्या. अफगाणिस्तानसाठी राशिद खान आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. इब्राहीम झद्रान याने 17, सेदीकुल्लाह अटल 16, गुलबदीन नईब याने 13 तर रहमानुल्लाह गुरुबाज याने 10 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. सर्वांनीच विकेट मिळवल्या. कगिसो रबाडा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. लुंगी एन्गिडी आणि वियान मुल्डर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत अफगाणिस्तानला गुंडाळण्यात चांगली साथ दिली.
दक्षिण आफ्रिकेची विजयी सुरुवात
🚨 MATCH RESULT 🚨
🇿🇦 Rabada picks up 3 wickets as South Africa bowls out Afghanistan for 208 runs 💪.
A fantastic all-round performance in the first match of Group B by the Proteas 🏏🔥. #WozaNawe #BePartOfIt #ChampionsTrophy #AFGvSA pic.twitter.com/qWa7BG9Y2b
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 21, 2025
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारूकी आणि नूर अहमद.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.