अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेटने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक क्रिकेटपटू जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत आहेत. असं असताना अफगाणिस्तान क्रिकेटसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण 38 वर्षीय खेळाडू मृत्यूशी झुंज देत आहे.

अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज
अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयाच मृत्यूशी देतोय झुंज
Image Credit source: GETTY IMAGES/Instagram
| Updated on: Apr 20, 2026 | 8:25 PM

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता वाढत चालली आहे. असं असताना अफगाणिस्तान क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अफगाणी क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण कधी काळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला खेळाडू आता मृत्यूशी झुंज देत आहे. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज शापूर जाद्रानने एक काळ गाजवला आहे. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणलं आहे. पण आता आयुष्याच्या एक कठीण वळणावर मृत्यूशी झुंज देत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला एक दुर्मिळ आणि जीवघेणा आजार झाला आहे. त्यामुळे 38 वर्षी जाद्रानवर दिल्लीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जानेवारीपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्याच्या प्रकृतीत फार काही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

क्रिकेटपटू शापूर जाद्रानला हेमोफॅगोसिटिक लिम्फोहिस्टियोसायटोसिस या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. या आजारात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती असामान्यपणे अतिसक्रिय होते. या स्थितीत स्वत:च्या अवयांवर हल्ला करण्यास सुरूवात करते. याचा परिणाम थेट अस्थिमज्जा, यकृत, प्लीहा आणि लिम्फ नोड्सवर होतो. त्यामुळे तीव्र सूज येते आणि संसर्ग होतो. शापूरचा धाकटा भाऊ गमार जाद्रानच्या मते, शापूरल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अस्वस्थ वाटू लागले. अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांना चांगल्या उपचारांसाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला. तपासणी क्षयरोगासह गंभीर संसर्ग झाल्याचं उघड झालं. एमआरआय आणि सीटी स्कॅन केल्यानंतर संसर्ग मेंदूपर्यंत पसरल्याचं दिसून आलं.

शापूर जाद्रानवर सुरूवातीला उपचार केल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसून आले होते. त्यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याची प्रकृती 20 दिवस स्थिर होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा प्रकृती ढासळल्याचं दिसून आलं. 2009 ते 2020 या काळात अफगाणिस्तानकडून खेळला. त्याने 44 वनडे आणि 36 टी20 सामने खेळा आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक संघांना अडचणीत आलं आहे. इतकंच काय अफगाणिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला आहे.

Follow Us