AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : इरफान पठाणचा हार्दिक पांड्यावर जिव्हारी लागणारा वार, थेट म्हटलं की….

Hardik Pandya : इरफान पठाण सातत्याने हार्दिक पांड्याला लक्ष्य करत आलाय. मुंबईच्या पाचव्या पराभवानंतर त्याने पुन्हा एकदा हार्दिकला टार्गेट केलय. त्याने हार्दिक बद्दल थेट काही प्रश्न निर्माण केलेत. यंदाच्या सीजनमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी कशी आहे? त्यावरही एकदा नजर मारणं गरजेच आहे.

Hardik Pandya : इरफान पठाणचा हार्दिक पांड्यावर जिव्हारी लागणारा वार, थेट म्हटलं की....
Irfan Pathan-Hardik Pandya
| Updated on: Apr 23, 2024 | 12:10 PM
Share

जून महिन्यात T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. टीम सिलेक्शन दिल्लीमध्ये होणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहे. पण या बैठकीआधी माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलय. त्याने हार्दिक पांड्यालाच पिंजऱ्यात उभ केलय. इरफानच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या आहे. हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो, असं इरफानने म्हटलय.

इरफान पठाणने हार्दिक पांड्याबद्दल चिंता व्यक्त केली. हार्दिक पांड्याच्या विद्यमान फॉर्मबद्दल, त्याच्या चेंडू हिट करण्याच्या क्षमतेबद्दल ही चिंता आहे. हार्दिकचा फिटनेस आणि गोलंदाजीवरही इरफानने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. सध्या हार्दिक पांड्या टीम इंडियाची ताकद नाही, तर सर्वात मोठी कमजोरी ठरतोय, असं इरफान पठाणच्या बोलण्यावरुन वाटतय.

इरफान पठाणने काय म्हटलय?

भारताचा दिग्गज ऑलराऊंडर इरफान पठाणने हार्दिक पंड्याबद्दलच आपलं मत X-हँडलवर व्यक्त केलय. “हार्दिक पांड्याच्या बॅटिंग करण्याच्या क्षमतेमध्ये घसरण होतेय. चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याची क्षमता पहिल्यासारखी दिसत नाही. टीम इंडियाच्या दृष्टीकोनातून हे चांगले संकेत नाहीयत. ही चिंता वाढवणारी बाब आहे. हार्दिक वानखेडेवर खेळताना वेगळा दिसतो. तेच गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचेसवर हार्दिकचा संघर्ष सुरु असतो, ही चिंतेची बाब आहे” असं इरफान पठाणने म्हटलय.

हार्दिकने या सीजनमध्ये किती धावा केल्यात?

हार्दिक पंड्याने IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 8 सामन्यात फक्त 151 धावा केल्या आहेत. त्यात 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. अजूनपर्यंत एकदाही त्याने अर्धशतकी खेळी केलेली नाही. 8 सामन्यात हार्दिकने फक्त 7 सिक्स निघालेत. यात वानखेडेवर त्याने जास्त सिक्स मारलेत. पांड्याचा या सीजनमधील बॅटिंग स्ट्राइक रेट आतापर्यंत 142.45 चा आहे. तेच यंदाच्या सीजनमध्ये 8 सामन्यात त्याने केवळ 4 विकेट काढलेत.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.