
भारतातील स्वितझर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे 22 एप्रिलला भारतातील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांसह एकूण 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये आली. केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत असलेले अनेक करार थांबवले. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्यानंतर आता भारत सरकारने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर भारतात 16 पाकिस्तानी युट्बूय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये आयपीएल 2008 मध्ये केकेआरसाठी खेळणारा आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज असलेल्या शोएब अख्तर याच्या यूट्यूब चॅनेलचाही समावेश आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं, अशी जनभावना पाहायला मिळत आहे. अशात केंद्र सरकार पाकिस्तानची शक्य त्या मार्गाने कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आधीची वांदे असलेल्या पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यात आता 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स भारतात दिसणार नसल्याने त्याचा थेट फटका हा कमाईवर होणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या पाहता केंद्र सरकारची ही मोठी कारवाई आहे.
गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स हे भारत, सैन्य दल आणि सुरक्षा यंत्रणांसंदर्भात प्रक्षोभक कंटेंट दाखवतात. भारताविरोधात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करतात, असं गृह मंत्रालयानं म्हटलं होतं. त्यानंतर या 16 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यापैकी 3 यूट्यूब चॅनेल्सही क्रिकेटपटूंची आहेत. यामध्ये शोएब अख्तर आणि बासित अली यांचा समावेश आहे.
शोएब अख्तर आणि बासित अली या दोघांचे व्हीडिओ भारतात मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना केंद्रस्थानी ठेवून कंटेट तयार केला जायचा, ज्यामुळे जास्तीत व्हीव्यूज आणि त्यातून उत्पन्न मिळायचं. विराट कोहलीचं कौतुक करणं, रोहित शर्मा याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणं, गौतम गंभीरबाबत काहीही बोलणं या सारख्या विषयांवर आधारित व्हीडिओ असायचे. क्रिकेट चाहत्यांच्या आवडीचे आणि चर्चेत असणाऱ्या खेळाडूं संदर्भात व्हीडिओ असल्याने मोठ्या प्रमाणात व्हीव्यूज मिळायचे. त्यातून हजारो-लाखो रुपयांची कमाई व्हायची. मात्र आता केंद्र सरकारने यूट्यूब चॅनेल्सने बंदी घातल्याने कमाईचं साधनही बंद झालंय.
केंद्र सरकारची भारतात पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर ‘स्ट्राईक’
On the recommendations of the Ministry of Home Affairs, the Government of India has banned the 16 Pakistani YouTube channels including Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and… pic.twitter.com/AusR1fCkvN
— ANI (@ANI) April 28, 2025
दरम्यान काही दिवसांपूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पीएसएल 2025 स्पर्धेच्या प्रक्षेपणावरही बंदी घालण्यात आली. पाकिस्तानमध्ये सध्या पीएसएल (Pakistan Super League) स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी आहेत. भारतातून पीएसएल क्रिकेट स्पर्धा पाहणाऱ्यांची मोठी संख्या होती. मात्र भारतात पीएसएल न दाखवण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला हा मोठा झटका लागला. त्याचा थेट परिणाम हा कमाईवरही झाला आहे.