T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया हरली पण एक क्रिकेटपटू खोऱ्याने छापणार पैसे

नशीब फळफळल, आतापासूनच त्याच्या घराबाहेर लागली रांग

T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया हरली पण एक क्रिकेटपटू खोऱ्याने छापणार पैसे
Team India
| Updated on: Nov 14, 2022 | 12:50 PM

मुंबई: टीम इंडियाने भले टी 20 वर्ल्ड कप जिंकला नाही. पण एका फलंदाजाची बॅट खूप चालली. त्याचं नाव आहे सूर्यकुमार यादव. त्याने आपल्या बॅटिंगने तमाम क्रिकेट रसिकांचं मन जिंकलं. मैदानातच नाही, मैदानाबाहेरही सूर्यकुमार यादवचा मोठा बोलबाला आहे. सूर्यकुमारच्या ब्रँड व्हॅल्युमध्ये 200 टक्के वाढ झाली आहे. जाहीरात विश्वातून सूर्यकुमार यादवला मोठी मागणी आहे. त्याच्या एंडोर्समेंट फी मध्ये 200 टक्के वाढ झालीय.

आता दिवसाला किती लाख चार्ज करतो?

6 ते 7 मोठे ब्रँड्स सूर्यकुमारला आपला ब्रँड एम्बेसेडर म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत. यात बेवरेज, मोबाइल एक्सेससरीज, मीडिया आणि स्पोर्ट्सच्या ब्रँड्सचा समावेश आहे. सूर्यकुमार आयपीएलच्या आधी प्रत्येक दिवसासाठी 20 लाख रुपये चार्ज करायचा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमारने आता एंडोर्समेंट फी वाढवलीय. आता तो प्रत्येक दिवसासाठी 65 ते 70 लाख रुपये चार्ज करतो.

युवा क्रिकेटर्स जाहीरातीमधून किती कमावतात?

सूर्यकुमार आधी फक्त 4 ब्रँड्स एंडोर्स करायचा. आता त्याची संख्या वाढून 20 पर्यंत जाऊ शकते. इंडस्ट्री एक्सपर्ट्नुसार, नवीन खेळाडू प्रतिदिन 25 ते 50 लाख रुपये चार्ज करतात. यशस्वी युवा क्रिकेटपटू 50 लाख ते 1 कोटी रुपये कमावतात.

सध्याची संपत्ती 32 कोटी

सूर्यकुमार यादवने आयपीएलपासून करीयरला सुरुवात केली. तेव्हा त्याला फक्त 10 लाख रुपये मिळायचे. 2022 मध्ये ही रक्कम वाढून 8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. आता तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. 2013 साली सूर्यकुमारला आयपीएलमधून फक्त 10 लाख रुपये मिळाले होते. प्रतिमहिन्याच्या हिशोबाने ती रक्कम 80 हजार रुपये होते. सूर्यकुमार यादवची सध्याच्यी संपत्ती 32 कोटींच्या घरात आहे.

सूर्यकुमार यादवला महागड्या कार्सचा शॉक आहे. त्याच्याकडे Mercedes-Benz GLE Coupe ही कार आहे. त्याची किंमत 2.15 कोटी रुपये आहे. सूर्यकुमार ऑडी, रेंज रोव्हर सारख्या महागड्या कार्सचा मालक आहे.