T20 World Cup 2021 : फेरबदलाची चर्चा, टीम इंडिया विश्वचषकावर लक्ष कसं केंद्रीत करणार?

| Updated on: Sep 13, 2021 | 12:33 PM

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतासह सर्वच देशांनी आप आपले संघ जाहीर केले आहेत. यावेळी अनेक संघात नवे बदल झाले आहेत.

T20 World Cup 2021 : फेरबदलाची चर्चा, टीम इंडिया विश्वचषकावर लक्ष कसं केंद्रीत करणार?
भारतीय क्रिकेट संघ
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच आगामी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) संघ जाहीर केला. त्यामुळे आता विश्वचषकाची संपूर्ण तयारी झाली असून एकप्रकारे सराव म्हणून आय़पीएलच्या सामन्यांमध्ये भारताचे शिलेदार मैदानात उतरणार आहेत. पण याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून एका रिपोर्टनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

एकदिवसीय आणि टी-20 संघाचं कर्णधारपद विराट सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संघ विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करत असताना अशाप्रकारे संघात मोठे बदल होणार असल्याने त्याचे परिणाम संघाच्या कामगिरीवर होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. दरम्यान विराटची जागा घेण्यासाठी सर्वात मोठा आणि योग्य पर्याय हा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच आहे. रोहितने भारतीय संघाचं काही सामन्यात उत्तमरित्या नेतृत्त्व केलं आहे. टी-20 संघाचा विचार करता जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असणाऱ्या आयपीएलच(IPL) जेतेपद रोहितनेच मुंबईला तब्बल 5 वेळा मिळवून दिले आहे. याशिवाय रोहितने भारताला  एकदिवसीय सामन्यांचा आशिया कप यासारखी स्पर्धाही जिंकवून दिली आहे. त्यामुळे विराटसाठी तोच योग्य पर्याय असेल.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

 

हे ही वाचा-

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

(After T20 world cup Virat kohli will no longer Indian captain with this chaos how team india will concentrate on World cup)