WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियन संघात टीम इंडियाच्या एका प्लेयरची प्रचंड दहशत, 2 वर्षांपूर्वी त्याने कामच तस केलय

WTC Final 2023 : पॅट कमिन्स आणि कंपनीला त्याच्यापासून विशेष सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला टीम इंडियाचा हा खेळाडू विराट कोहली वाटला असेल, पण तसं नाहीय. या खेळाडूची ऑस्ट्रेलिया विरुद्ध कामगिरीच तशी आहे.

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियन संघात टीम इंडियाच्या एका प्लेयरची प्रचंड दहशत, 2 वर्षांपूर्वी त्याने कामच तस केलय
Ind vs aus WTC Final 2023Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 9:23 AM

सिडनी : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे दिवस जवळ आलेत. अंतिम सामन्याला 10 पेक्षा कमी दिवस राहिलेत. WTC Final 2023 आधीच ऑस्ट्रेलियन गोटात चिंता आहे. एका भारतीय खेळाडूमुळे ऑस्ट्रेलियन टीमची चिंता वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी या भारतीय प्लेयरने घरात घुसून ऑस्ट्रेलियन टीमला नामोहरम केलं होतं. त्यामुळे पॅट कमिन्स आणि कंपनीला या भारतीय खेळाडूपासून विशेष सावध राहण्याची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियन टीमला तसा सल्लाच दिलाय. तुमच्या डोक्यात लगेच विराट कोहलीच नाव आलं असेल, नाही, तस नाहीय. हा खेळाडू विराट कोहली नाहीय.

टीम इंडियाच्या कुठल्या प्लेयरपासून संभाळून राहण्याचा सल्ला?

रिकी पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चेतेश्वर पुजारापासून संभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या या टेस्ट स्पेशलिस्टपासून सर्तक राहा, असा पॉन्टिंगचा सल्ला आहे.

दोन्ही रोलमध्ये तो परफेक्ट

“ऑस्ट्रेलियन आता जरुर चेतेश्वर पुजाराबद्दल विचार करत असेल. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाला दिलेल्या जखमा हे त्यामागच कारण आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवण्यात चेतेश्वर पुजाराने महत्वाची भूमिका बजावली होती” असं रिकी पॉन्टिंगने सांगितलं. भारताचा मागचा दौरा लक्षात घेता, पॉन्टिंगला ही भिती वाटतेय. कारण पुजारा संपूर्ण सीरीजमध्ये अभेद्य किल्ल्यासारखा क्रीजवर तळ ठोकून उभा होता. टीम इंडियाला मॅच जिंकवून देणं असो किंवा ड्रॉ करणं दोन्ही रोल त्याने परफेक्ट निभावले होते.

टीम इंडिया येण्याआधी त्याच्या इंग्लंडमध्ये 3 सेंच्युरीसह 545 धावा

ऑस्ट्रेलियन टीम इंग्लंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. पण पुजारा इथेही त्यांच्यासाठी धोका बनू शकतो. भारताचे खेळाडू भले आता इंग्लंडमध्ये पोहोचले असतील, पण पुजारा मागच्या 2 महिन्यांपासून तिथे काऊंटी क्रिकेट खेळतोय. त्याने तिथे 6 सामन्यात 8 इनिंगमध्ये 3 सेंच्युरीसह 545 धावा केल्यात. टीम इंडियात ‘या’ खेळाडूची निवड न झाल्याबद्दल आश्चर्य

हार्दिक पांड्याची WTC फायनलसाठी निवड झाली नाही, त्यावर रिकी पॉन्टिंगने आश्चर्य व्यक्त केलं. हार्दिक पांड्याचा फिटनेस टेस्ट क्रिकेटसाठी नाहीय, हे मला माहितीय पण तो भारतीय टीमसाठी एक्स फॅक्टर ठरला असता, असं पॉन्टिंग म्हणाला.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.