
वर्ल्ड कपचा आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना होतोय. या सामन्याकडे जगाच्या नजरा आहेत.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टॉस झाला. हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला. यावेळी भारतीय वायुसेनेकडून सलामी देण्यात आली.

वर्ल्ड कप फायनल सामन्यासाठी वायुसेनेकडून 15 मिनिटे सलामी देण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उत्साह पाहायला मिळाला.

वायुसेनेच्या विमानांचा हा एअर शो आणि वर्ल्ड कप फायनल... यामुळे अहमदाबाद शहरात इंडिया... इंडिया असा जयघोष पाहायला मिळाला.

आज होणाऱ्या या महामुकाबल्याकडे सर्वांचं लक्ष आहे. भारताने हा वर्ल्डकप जिंकावा, यासाठी सदिच्छा दिल्या जात आहेत. वायुसेनेच्या विमानांचा हा एअर शो...