Ranji Trophy : सलग 8 बॉलमध्ये 8 सिक्स, 11 चेंडूत अर्धशतक, आकाश चौधरी युवराजपेक्षा सरस! वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, पाहा व्हीडिओ

Akash Kumar Choudhary Fastest Fifty First class Cricket : आकाश कुमार याने रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. आकाशने एका विस्फोटक आणि वादळी अर्धशतकासह वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या.

Ranji Trophy : सलग 8 बॉलमध्ये 8 सिक्स, 11 चेंडूत अर्धशतक, आकाश चौधरी युवराजपेक्षा सरस! वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, पाहा व्हीडिओ
Akash Kumar Choudhary World Record
Image Credit source: Getty
Updated on: Nov 09, 2025 | 5:06 PM

देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफीचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत अनकॅप्डसह कॅप्ड खेळाडूही खेळत आहेत. या स्पर्धेत एका भारतीय फलंदाजाने धमाका केला आहे. मेघालयचा युवा फलंदाज आकाश कुमार चौधरी याने अरुणाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड करत साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आकाशने सुरतमध्ये अवघ्या 11 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक केलंय. आकाशने यासह फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

आकाशकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

आकाशने विस्फोटक खेळी करत मेघालयला 600 पार पोहचवणयात मदत केली. मेघायलयने पहिला डाव हा 628 धावांवर घोषित केला. आकाशने यात 50 धावांचं योगदान दिलं. आकाशने 14 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. आकाशने अर्धशतक करताच 13 वर्षांआधीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम हा वेन व्हाईट याच्या नावावर होता.

वेन व्हाईट याने 2012 साली एसेक्स टीम विरुद्ध 12 बॉलमध्ये 50 रन्स केल्या होत्या. मात्र आकाशने वेनच्या तुलनेत 1 चेंडूआधी हे अर्धशतक पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. तर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात बंदीप सिंह याच्या नावावर वेगवान अर्धशतकाचा विक्रम होता. जम्मू-काश्मीरच्या फलंदाजाने 2015-2016 साली त्रिपुरा विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. तेव्हा बंदीपने 15 चेंडूंचा सामना केला होता.

एका ओव्हरमध्ये 6 सिक्स

तसेच आकाशने या स्फोटक अर्धशतकी खेळीत एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. आकाश रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला. सर्वात आधी रवी शास्त्री यांनी एका ओव्हरमध्ये 6 षटकार झळकावले होते. तसेच आकाशने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले. त्यानंतर आकाशने पुन्हा त्याच्या खेळीतील पुढील 2 चेंडूत आणखी 2 षटकार लगावले. आकाशने अशाप्रकारे एकूण 8 चेंडूत 8 षटकार लगावले.

दरम्यान आकाश सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. आकाशची गेल्या सामन्यात बिहार विरुद्धही बॅट तळपली होती. आकाशने तेव्हा अर्धशतक झळकावलं होतं. आकाशने बिहार विरुद्ध 62 बॉलमध्ये 60 रन्स केल्या. आकाशने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.

आकाश चौधरी रणजी ट्रॉफीतील सिक्सर किंग, पाहा व्हीडिओ

आकाशची फर्स्ट क्लास कारकीर्द

दरम्यान आकाशने आतापर्यंत 30 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये मेघालयचं प्रतिनिधित्व केलं आहे. आकाशने 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच आकाशने बॉलिंगनेही अनेक फलंदाजांना ढेर केलंय. आकाशने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 85 विकेट्स मिळवल्या आहेत.