वेस्ट इंडिजच्या टी 20 वर्ल्ड कप टीममधून ड्रॉप होताच ‘त्या’ दोन स्टार्सनी मैदानात काढला ‘राग’

| Updated on: Sep 15, 2022 | 1:40 PM

वेस्ट इंडिजने काल T20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली. या टीममध्ये दोन खेळाडूंना स्थान मिळालेलं नाही.

वेस्ट इंडिजच्या टी 20 वर्ल्ड कप टीममधून ड्रॉप होताच त्या दोन स्टार्सनी मैदानात काढला राग
west indies team
Follow us on

मुंबई: वेस्ट इंडिजने काल T20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली. या टीममध्ये दोन खेळाडूंना स्थान मिळालेलं नाही. त्यावर बरीच चर्चा होतेय. खरंतर या दोन प्लेयर्सची वेस्ट इंडिजच्या टीममध्ये निवड न होणं धक्कादायक आहे. आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या दोन प्लेयर्सना वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.

प्रदर्शनातून सिलेक्टर्सना संदेश दिला

टीममध्ये दोघांची निवड झाली नाही. त्याची सल मनात होती. त्यांनी मैदानावर प्रदर्शनातून सिलेक्टर्सना संदेश दिला. दोघांनी मिळून आपल्या टीमला विजय मिळवून दिला व अजूनही आपल्यात दम असल्याचं दाखवून दिलं. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 14 सप्टेंबरला मॅच झाली.

दोघेही गुयानाच्या टीमवर भारी पडले

गुयाना विरुद्ध ट्रिनबागोमध्ये सामना झाला. आंद्र रसेल आणि सुनील नरेन ट्रिनबागोमधून खेळतात. या दोघांच्या दमदार प्रदर्शनामुळे गुयानाचा पराभव झाला. दोघांनीच गुयानाच्या टीमची वाट लावली. सुनील नरेनने बॉलिंगआधी बॅटिंगमध्ये कमाल केली.

कुठल्या टीमने किती रन्स केल्या?

ट्रिनबागोच्या टीमने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 150 धावा केल्या. गुयाना वॉरियर्सची टीम विजयासाठी 151 धावा करु शकली नाही. 26 धावांनी गुयानाची टीम मॅच हरली.

गोलंदाजीत कशी कमाल दाखवली ते जाणून घ्या

दोघांनी गोलंदाजीत कशी कमाल दाखवली, ते समजून घ्या. आंद्र रसेलने 2.5 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 16 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. नरेनने 4 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. दोघांनी 25 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. म्हणजे निम्मा संघ तंबूत धाडला. त्यांच्या गोलंदाजीची इकॉनमी सुद्धा उत्तम होती.