“बुमराहने बाउंसर….”, कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूला सायना नेहवालची अखेर मागावी लागली माफी

कोलकाता नाईट रायडर्सचा युवा खेळाडू अंगकृष रघुवंशी याला एक प्रतिक्रिया देणं चांगलंच महागात पडलं आहे. सायना नेहवालने क्रिकेट आणि इतर खेळांची तुलना करताना व्यथा मांडली होती. यावर अंगकृष रघुवंशीने तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावर आता माफी मागण्याची वेळ आली आहे.

बुमराहने बाउंसर...., कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूला सायना नेहवालची अखेर मागावी लागली माफी
| Updated on: Jul 12, 2024 | 9:53 PM

कोलकाता नाईट रायडर्सचा युवा खेळाडू अंगकृष रघुवंशी याला सायना नेहवालवर प्रतिक्रिया देणं महागात पडलं आहे. त्याने या प्रकरणी सायना नेहवालची आता जाहीर माफी मागितली आहे. सायना नेहवाल हीने क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये तुलना केली होती. इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटला चांगला भाव मिळतो, असं तिने सांगितलं होतं. “प्रत्येकाला माहिती करून घ्यायची असते की सायना करते, कुस्तीपटू आणि बॉक्सर काय करतात, नीरज चोप्रा काय करतो. प्रत्येकाला या खेळाडूंबाबत माहिती आहे. कारण सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत. त्यामुळे न्यूजपेपरमध्ये असतो. मी जे काही केलं तरी जवळपास स्वप्नवत होतं. मी असं भारतात राहून करून दाखवलं जिथे क्रीडासंस्कृती नाही.”, असं सायना नेहवालने सांगितलं. “खूप वाईट वाटतं की क्रिकेट खूप महत्त्व दिलं जातं. क्रिकेटपेक्षा जास्त ताकद इतर खेळांमध्ये लागते. पण तितकं महत्त्व मिळत नाही. शटल उचलल्यानंतर आणि 20 सेकंद मोठा श्वास घेता. वेळही नसतो आणि सर्व करावं लागतं. क्रिकेटला जास्त महत्त्व मिळतं जिथे ताकदीपेक्षा स्किल सर्वात महत्त्वाचं असतं.”

सायना नेहवालच्या या वक्तव्यानंतर अंगकृष रघुवंशी संतापला आणि सोशल मीडियावर व्यक्त झाला. त्याने बॅडमिंटन स्टार नेहवालच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, जर जसप्रीत बुमराह 150 च्या स्पीडने गोलंदाजी करेल तेव्हा सायना कशी खेळेल. अंगकृषच्या प्रतिक्रियेनंतर क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याला या प्रकरणी जाहीर माफी मागावी लागली आहे. ‘मी सर्वांची माफी मागतो. माझी प्रतिक्रिया एक विनोद होता. पण मागे वळून पाहताना वाटते की, अपरिपक्व विनोद होता. मला माझी चूक कळली आहे आणि मनापासून माफी मागतो.’


अंगकृष रघुवंशी भारतासाठी अंडर 19 क्रिकेट खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. अंगकृष राईट हँडेड बॅट्समन आहे आणि कोलकात्यासाठी ओपनिंग करतो. त्याने आयपीएल 2024 मध्ये पदार्पण केलं होतं.दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध वादळी अर्धशतक झळकावल्यानंतर चर्चेत आला होता.