
भारताबद्दल सगळ्यांनाच आदर असलेले माजी क्रिकेट कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच आयपीएल 2026 सुरू होण्याआधी सानिया चंडोक सोबत विवाह बंधनात अडकणार आहे.

विविध वृत्तांनुसार, अर्जुन आणि सानिया याची लग्नसोहळा 3 ते 5 मार्च 2026 दरम्यान कधीही होऊ शकतो असे समजतं. या खास प्रसंगी सचिन तेंडुलकरने देशातील अनेक मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी ही क्षणिक आठवण म्हणून काही फोटो एक्स (पूर्वी ट्विटर) वर शेअरही केले आहेत.

सचिन तेंडुलकरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. सोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये सचिन आणि पंतप्रधान मोदी यांचा एकत्रित फोटो दिसत आहे.

लग्नासाठीचे निमंत्रण देण्यासाठी सचिन तेंडुलकर भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही भेटले. त्यांनी याबाबतचा एक फोटोही एक्सवर शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. फोटोमध्ये अमित शाह यांच्यासोबतचा सचिनचा क्षण स्मरणीय दिसतो.

राहुल गांधी यांना पण सचिन तेंडुलकरने अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नासाठी आमंत्रण दिले आहे. सचिन यांनी राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो एक्सवर शेअर करून त्यांचे आभार मानले आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील सचिन तेंडुलकरने त्याच्या मुलाच्या लग्नासाठी अतिशय आदरपूर्वक निमंत्रण दिले आहे. या भेटीचा फोटो सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

यासह मोठे दिग्गज खेळाडू, राजकीय नेते, बॉलिवूड सुपरस्टारसह अनेक मंडळी या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.