
मुंबई: भारताचे माजी क्रिकेटपटू (India Former Cricketer) अरुण लाल (Arun lal) यांनी पश्चिम बंगालच्या रणजी संघाच्या (West bengal Ranji Team) कोच पदाचा राजीनामा दिला आहे. अरुण लाल यांच्या मार्गदर्शनाखाली या सीजन मध्ये बंगालचा संघ रणजी सेमीफायनल मध्ये पोहोचला होता. ते बऱ्याच वर्षांपासून पश्चिम बंगालच्या रणजी संघाशी संबंधित आहेत. पण आता वाढत वय आणि थकवा यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. “हा निर्णय मी माझ्या मनाने घेतलाय. मी स्वखुशीने हा निर्णय घेतला आहे. असंतुष्ट असण्याचा प्रश्नच येत नाही. माझं वय झालय. पश्चिम बंगालचा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलय. पुढच्या चार-पाच वर्षात पश्चिम बंगालचे खेळाडू नाम कमावतील” असं अरुण लाल म्हणाले.
आता मला माझा वेळ कुटुंबासमवेत घालवायचा आहे, असंही अरुण लाल म्हणाले. मे महिन्याच्या सुरुवातीला अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल सोबत लग्न केलं. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे सोशल मीडियावर या लग्नाची बरीच चर्चा झाली. राजीनाम्यानंतर अरुण लाल आता हनीमूनला जाण्याची योजना बनवत आहेत.
अरुण लाल नव्या नवरीसोबत टर्कीला जाण्याची योजना बनवत आहेत. त्याआधी ते लवकरच दार्जिलिंग आणि कालिंपोंग येथे जातील. क्रिकेटपासून दूर राहून त्यांना आता वैवाहिक आयुष्यासाठी वेळ द्यायचा आहे.
अरुण लाल यांनी रीनाशी पहिले लग्न केले होते. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. पहिल्या पत्नी रीना या दीर्घकाळापासून आजारी आहेत. अरुण लाल यांचे पहिल्या पत्नीच्या इच्छेनेच दुसऱ्यांदा लग्न झालं आहे.
अरुण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. ते बंगालकडून क्रिकेट खेळले आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अधिकारी, सहकारी क्रिकेटपटू, बंगालचे क्रिकेटपटू आणि इतर कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या लग्नाला आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये अरुण लाल यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांनी कॉमेंट्री सोडली. त्यानंतर आजाराला हरवून त्यांनी बंगाल संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
अरुण लाल यांच्याबद्दलची एक छोटीशी आठवण तिने सांगितली. त्यामुळे अरुण लाल तिला जास्त भावले. “पहिल्या नजरेत आम्हाला प्रेम झालं नाही. पण लवकर आम्ही परस्परांच्या प्रेमात पडलो. अरुण लाल चांगल्या मनाचा एक दयाळू माणूस आहे. निर्सग, प्राणी आणि गरीबांबद्दल त्यांना आत्मियता आहे. समजा अरुण लाल त्यांच्या कारमध्ये असतील आणि त्यांच्याकडे पैसे नसतील आणि एखादा भिखारी समोर आला, तर ते माझ्याकडून पैसे घेऊन त्याला देतील. दुसऱ्यांबद्दल त्यांना सहानुभूती आहे. हेच त्यांचे गुण विशेष भावले” असं बुलबुल साहाने सांगितलं.