ENG vs AUS 4th Test | चौथ्या टेस्टसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन जाहीर, घातक गोलंदाजाची एन्ट्री

Ashes Series 2023 England Playing 11 For 4th Test | इंग्लंड क्रिकेट टीमने चौथ्या टेस्ट मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

ENG vs AUS 4th Test | चौथ्या टेस्टसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन जाहीर, घातक गोलंदाजाची एन्ट्री
| Updated on: Jul 17, 2023 | 4:12 PM

लंडन | प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस 2023 मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट टीम आणि आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठी टीममध्ये एकमेव बदला केला आहे. चौथ्या सामन्यासाठी टीममध्ये दिग्गज जेम्स एंडरसन याची एन्ट्री झाली आहे. तसेच मोईन अली या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचं ईसीबीने स्पष्ट केलं आहे.

चौथा कसोटी सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान मँचेस्टर ओल्ड ट्रॅफोर्ड इथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या 48 तासांआधी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केलीय. तिसऱ्या कसोटीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ओली रॉबिन्सन याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. तर एंडरसनचं पुनरागमन झालंय.

बॅटिंग लाईनअप

बेन स्टोक्स याने बेन डकेट आणि झॅक क्रॉली या सलामी जोडीवर विश्वास दाखवला आहे. मोईन अली वनडाऊन येऊ शकतो. तर माजी कर्णधार जो रुट याच्याकडून चांगल्या आणि दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

इंग्लंडचं बॉलिंग अटॅक

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाची जबाबदारी ही जेम्स एंडरसन, स्टुअर्ट ब्रॉर्ड, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांच्यावर असेल. फिरकीची जबाबदारी ही मोईन अली पार पाडेल. तसेच जो रुट याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडीवर

दरम्यान ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. अटीतटीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात कॅप्टन पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसरा सामनाही रंगतदार झालेला. इथे अवघ्या 43 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला. आता तिसरा सामना इंग्लंडसाठी मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने 3 विकेट्सने विजय मिळवतं खातं उघडलं.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन जाहीर

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कॅप्टन) , बेन डकेट, मोईन अली, झॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जोनाथन बॅरिस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स एंडरसन.