World Cup संघात अखेर अक्षर पटेल ऐवजी या खेळाडूला मिळाली संधी! सराव सामन्यासाठी गुवाहाटीत हजेरी

Team India for World Cup : वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्याने कोणाला संधी मिळणार? याबाबत चर्चा होती. आता या प्रश्नाचं उत्तर कोड्यात का होईना मिळालं आहे.

World Cup संघात अखेर अक्षर पटेल ऐवजी या खेळाडूला मिळाली संधी! सराव सामन्यासाठी गुवाहाटीत हजेरी
टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघात या खेळाडूला मिळाली नशिबाची साथ, थेट सराव सामन्यासाठी गुवाहाटीला रवाना
| Updated on: Sep 28, 2023 | 6:52 PM

मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच भारताने घेतली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे. पण आशिया कप स्पर्धेत अक्षर पटेल याला दुखापत झाली आणि एका जागेसाठीचं गणित बदललं. अक्षर पटेल बरा होईल इथपासून त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल? इथपर्यंत चर्चांना उधाण आलं होतं. आता या प्रश्नाचं जवळपास क्लियर झालं आहे असंच म्हणावं लागेल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया तीन सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना 30 सप्टेंबरला होणार आहे. समोर इंग्लंडसारखा दिग्गज संघ आहे. या सराव सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीत पोहोचली आहे. पण एका जागेसाठी कोणता प्लेयर हजेरी लावतो याची उत्सुकता होती. अखेर आर अश्विन तिथे पोहोचल्याचं कळत आहे. त्यामुळे अक्षर पटेल ऐवजी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आर अश्विन खेळण्याची शक्यता बळावली आहे.

आर. अश्विनला मिळणार संधी?

अक्षर पटेल याच्या रिप्लेसमेंटची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. पण सराव सामन्यासाठी आर. अश्विन पोहोचल्याने त्याला संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे दुखापतग्रस्त अक्षर पटेल याला वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी मुकावं लागणार आहे. आर अश्विनला संधी मिळणार याबाबतची घोषणा थोड्याच वेळात होऊ शकते. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर याचं नावंही चर्चेत आहे. वॉशिंग्टन रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरला होता.

आशिया कप स्पर्धेत अक्षर पटेल जखमी झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतही खेळला नव्हता. अक्षर पटेल याच्या ऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन यांना संधी मिळाली होती. आर अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन सामने खेळले आणि चांगली गोलंदाजी केली. तर वॉशिंग्टन सुंदर आपली छाप पाडू शकला नाही.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज, (अक्षर पटेल/आर अश्विन/वॉशिंग्टन सुंदर) .