Asia cup Final 2022: पराभवानंतर दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी टीमची अब्रु काढली, एकदा हा VIDEO बघा

Asia cup Final 2022: श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेत सलग श्रीलंकेने दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी रात्री ही फायनल झाली.

Asia cup Final 2022: पराभवानंतर दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी टीमची अब्रु काढली, एकदा हा VIDEO बघा
pak vs sl
Image Credit source: AFP
| Updated on: Sep 12, 2022 | 12:14 PM

मुंबई: श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेत सलग श्रीलंकेने दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी रात्री ही फायनल झाली. श्रीलंकेने पाकिस्तानवर 23 धावांनी विजय मिळवला. भानुका राजपक्षे श्रीलंकेच्या विजयाचा नायक ठरला. त्याने स्वबळावर श्रीलंकेचा डाव सावरला व पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.

या इनिंगने पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्ट रचली

पाकिस्तानने काल टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिली. भानुका राजपक्षे शेवटच्या ओव्हरपर्यंत क्रीझवर टीकून होता. त्याने नाबाद 71 धावा फटकावल्या. त्याच्या या इनिंगने पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्ट रचली.

पाकिस्तानच्या पराभवाची दिल्ली पोलिसांनी घेतली मजा

राजपक्षेला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची पाकिस्तानकडे संधी होती. पण पाकिस्तानी खेळाडूंनी त्याची कॅच सोडून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली. पाकिस्तानी प्लेयर्सनी राजपक्षेची कॅच नाही, एकप्रकारे ट्रॉफीच हातातून सोडली.

19 व्या ओव्हरमधला व्हिडिओ

पाकिस्तानच्या या पराभवाची दिल्ली पोलिसांनी मजा घेतली. शादाब खान आणि आणि आसिफ खान दोघांनी हा झेल सोडला. या झेल सोडण्याचा व्हिडिओ शेयर करुन त्यांनी पंच मारला. दिल्ली पोलिसांनी शेयर केलेला व्हिडिओ 19 व्या ओव्हरमधला आहे. राजपक्षेची कॅच पकडण्याच्या प्रयत्नात शादाब आणि आसिफ परस्परांना धडकले. दोघांमधील विसंवादामुळे सोपी कॅच सुटली व राजपक्षेच्या खात्यात 6 धावा जमा झाल्या.

शादाबने चूक मान्य केली

दोघांनी कॅच सोडल्याचा व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी रोड सेफ्टीशी जोडला आहे. ‘ए भाऊ, जरा बघून चाल’ असं कॅप्शन या व्हिडिओला दिलय. दिल्ली पोलिसांच्या या पंचवर फॅन्सनी सुद्धा मजा घेतलीय. दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी टीमची चांगलीच अब्रु काढली असं काही युजर्सनी म्हटलं आहे. राजपक्षेने डीप मिडविकेटला मोठा फटका खेळला होता. आसिफने जवळपास कॅच पकडली होती. पण शादाबने त्याचवेळी डाइव्ह मारली आणि कॅच सुटली. पराभवानंतर शादाबने चूक मान्य केली व पराभवाची जबाबदारी स्वीकारली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य दिले. श्रीलंकेचा डाव 147 धावात आटोपला.