
मुंबई: राग सर्वात वाईट गोष्ट आहे. रागामध्ये माणसाचं स्वत:वर नियंत्रण राहत नाही. रागात आपण काय करतोय हे माणसाला कळत नाही. रागामध्ये माणूस मोठी चूक करुन बसतो. अशीच चूक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेयरमन रमीज राजा यांनी केली. दुबईमध्ये रमीज राजा यांनी आशिया कपचा फायनल सामना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत बघितला.
पण फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. पराभवाच ते नैराश्य रमीज राजा यांना लपवता आलं नाही. भारतीय पत्रकाराच्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी त्याच्यावरच चिडचिड केली. माणसू चिडतो, तेव्हा त्याचा स्वत:वर ताबा राहत नाही. भारतीय पत्रकाराच्या एका प्रश्नावर रमीज राजा असेच चिडले.
आशिया कप 2022 च्या फायनल मॅचमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर 23 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानला हरवून श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपच जेतेपद पटकावलं आहे. टॉस हरल्यानंतरही श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवला. टॉस जिंकणारा संघ मॅच जिंकतो, हा दुबईमधला सध्याचा ट्रेंड आहे. श्रीलंकेने टॉस हरल्यानंतर आशिया कप जिंकला.
आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर पत्रकारांनी पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांना घेरलं. त्यावेळी भारतीय पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला. पाक टीमच्या पराभवाने जनता नाखुश होईल. तुम्ही काय संदेश द्याल? बस एवढ ऐकून रमीज राजा खवळले. त्या पत्रकाराने जणू प्रश्न विचारुन चूकच केलीय.
या व्हिडिओमध्ये रमीर राजा यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरुन ते किती चिडलेत, ते दिसतं. पीसीबी अध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतीय पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे होतं. त्यावर त्यांनी उलट सवाल केला. तुम्ही भारतीय आहात का? तुम्हाला पाकिस्तानच्या पराभवाने आनंद झाला असेल. एवढ्यावर रमीज राजा थांबले नाही. त्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मोबाइल सुद्धा हिसकावून घेतला.