AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर, कीपर म्हणून मुंबईकर खेळाडूची एन्ट्री

Asia Cup 2023 IND vs PAK : मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना खाली बसवण्यात आलं आहे. टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर झाली आहे. 

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर, कीपर म्हणून मुंबईकर खेळाडूची एन्ट्री
गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाची प्लेइंग 11 निश्चित नाही. त्यामुळे संघ स्थिर दिसत नाही. कारण संघाचे प्रमुख चार फलंदाज हेसुद्धा माहित नाहीआणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल हेसुद्धा काही नक्की नाही, असं शोएब अख्तर याने म्हटलं आहे.
| Updated on: Sep 02, 2023 | 3:35 PM
Share

मुंबई : आशिया कपमधील तिसऱ्या भारत आणि पाकिस्तानविरूद्धच्या  महमुकाबल्याला काही वेळात सुरू होणार आहे. टॉस जिंंकत कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने चार बॉलर आणि दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना खाली बसवण्यात आलं आहे. टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर झाली आहे.

इशान किशन याला संघाती कीपर म्हणून स्थान मिळालं आहे. सूर्या आणि अय्यरमध्ये रोहित आणि टीम मॅनेजमेंटने अय्यरला पसंती दिली आहे. सूर्याला वन डे क्रिकेटमध्ये सातत्य राखता आलं नाही याचाच फटका त्याला बसला आहे. सूर्याचे आणि श्रेयसचे आकडे पाहिले तर लक्षात येईल की दोघांमध्ये अय्यरचं पारडं वरचढ आहे. के.एल. राहुल दुखापती असल्याने त्याच्या जागी संघात इशान किशन याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला त्यानंतर विराट कोहली आणि मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. रोहितने स्पिनर्समध्ये कुलदीप यादव आणि  रविंद्र जडेजातकडे तर वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन  विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....