Asia Cup 2023 | आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात, टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येणार मॅच?

asia cup 2023 live streaming | आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी आता पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि टीम इंडियाने संघाची घोषणा केली आहे.

Asia Cup 2023 | आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात, टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येणार मॅच?
| Edited By: | Updated on: Aug 21, 2023 | 10:32 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड 2023 कपआधी आशिया कपचा थरार रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या बहुप्रतिक्षित आशिया कपसाठी बीसीसीआय निवड समितीने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा या 17 सदस्यीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडेच उपकर्णधारपद असणार आहे. हार्दिककडे असलेलं उपकर्णधारपद हे जसप्रीत बुमराह याला मिळणार असल्याची चर्चा कालपर्यंत क्रिकेट विश्वात रंगली होती. दरम्यान आशिया कप स्पर्धेतील सामने टीव्ही आणि मोबाईवर कुठे पाहता येतील, हे आपण जाणून घेणार आहोत.

आशिया कपचं वेळापत्रक

आळिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. म्हणजेच पाकिस्तान आणि श्रीलंकेकडे यजमानपद आहे. त्यानुसार स्पर्धेतील एकूण 13 सामने हे कँडी, कोलंबो, मुल्तान आणि लाहोरमध्ये खेळवण्या येतील. श्रीलंकेत 9 आणि पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशिया कपमधील सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील.

श्रीलंकेत होणारे सामने किती वाजता सुरु होणार?

टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. श्रीलंकेत भारतीय वेळेनुसार सामन्यांना 2 वाजता सुरुवात होईल.

सामने कोणत्या चॅनेलवर पाहता येणार? (Asia Cup 2023 Live Streaming)

क्रिकेट चाहत्यांना आशिया कपमधील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील.

आशिया कप 2023 सामने मोबाईल आणि लॅपटॉपवर कुठे पाहता येतील?

आशिया कप 2023 मधील सर्व सामने मोबाईल आणि लॅपटॉपवर डिज्नी+हॉटस्टार एपवर पाहता येतील.

आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

स्टँडबाय | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)