AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup मध्ये श्रीलंकेविरूद्ध योद्ध्यासारखं लढणाऱ्या मोहम्मद नबीने रचला इतिहास

AFG vs SL Asia Cup 2023 : अफगाणिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याने धुंवाधार खेळी करत सामना जवळ आणला होता. मात्र संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र नबीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Asia Cup मध्ये श्रीलंकेविरूद्ध योद्ध्यासारखं लढणाऱ्या मोहम्मद नबीने रचला इतिहास
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 06, 2023 | 3:51 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मधील अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमधील झालेला सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं फेडणारा ठरला. शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाला. तर श्रीलंका संघाने सुपर 4 मध्ये एन्ट्री केली आहे. अफगाणिस्तान संघाला त्यांची एक चूक चांगलीच महागात पडली. अफगाणिस्तान संघाला श्रीलंकेने विजयासाठी 293 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाला फक्त विजयच नाहीतर हे लक्ष्य 37.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र याबाबत मैदानात उतरल्यावर अफगाणी खेळाडूंना माहिती झाली.

अफगाणिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. रहमानुल्लाह गुरुबाझ 4 धावा, इब्राहीम झद्रान 7 धावा, गुलाबदीन नईब 22 धावांवर माघारी परतले.  50 धावांवर अफगाणिस्तान संघाचे 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर  रहमत शाह 45 धावा आणि हश्मतुल्लाह शाहिदीने 59 धावा केल्या. यांनी सामना चांगला खेचलेला पण सर्वात महत्त्वाची आणि स्फोटक खेळी मोहम्मद नबीने केली.

नबीने रचला इतिहास

मोहम्मद नबीने आक्रमक रूप धारत 32 बॉलमध्ये 65 धावा  केल्या यामध्ये त्याने 5 सिक्सर आणि 6 चौकार मारले. नबीने या खेळीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोहम्मद नबी याने अवघ्या 24 बॉलमध्ये अर्धशतक केलं, अफगाणिस्तानकडून सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. मोहम्मद नबीने 259 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 24.56 च्या सरासरीने 5011 धावा केल्या आहेत. यामध्ये 21 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.

दरम्यान, सुपर फोरमध्ये श्रीलंका, बांगलादेश, भारत आणि पाकिस्तान या सघांनी  एन्ट्री केली आहे. भारत-पाक सामना 10 सप्टेंबरला होणार आहे.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल