AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील लकी, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी

Asia Cup 2023, IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुपर फोरमधील दुसरा सामना होत आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याला थेट अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. चला जाणून घेऊयात लकी प्लेयर्स आणि इतर बाबी

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील लकी, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात हे खेळाडू करतील मालामाल, पिच रिपोर्टसह इतर बाबी समजून घ्या
| Updated on: Sep 11, 2023 | 11:02 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर फेरीतील दुसरा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. हा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीचा मार्ग सोपा होणार आहे. या सामन्यानंतर भारताला बांगलादेशसोबत, तर श्रीलंकेला पाकिस्तानसोबत सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यानंतर बरंचसं चित्र स्पष्ट होणार आहे. भारताने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. पण श्रीलंकेचं होम ग्राऊंड असल्याने भारताला विजय वाटतो तितका सोपा नसेल हे देखील तितकंच खरं आहे.

कसं असेल हवामान आणि पिच रिपोर्ट

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. पण सामन्यादरम्यान पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे सामना काही तासांसाठी थांबवावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, प्रेमदासा स्टेडियम फिरकीपटूंसाठी चांगलं असल्याचं गणलं जातं. पण भारताने याच मैदानात पाकिस्तान विरोधात 356 धावांची खेळी केली आहे. असं असलं तरी या मैदानात 260-280 धावा होऊ शकतात. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेणं पसंत केलं जाईल.

अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहील, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

श्रीलंकन टीम : पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, महीश थीकक्षाना, कसुन रजिथा, मथीशा पथिराना

लकी इलेव्हन आणि की प्लेयर्स

भारत आणि श्रीलंकेतील महत्त्वाचे खेळाडू : पाथुम निस्सांका, कुसल मेंडिस, दासुन शानाका, महीश थीक्षाना, मथीशा पथिराना, रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह.

लकी इलेव्हन : कुसल मेंडिस (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, पाथुम निस्सांका, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, धनंजय डिसिल्वा, दासुन शानाका, जसप्रीत बुमराह, मथीशा पथिराना

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...