
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर फेरीतील दुसरा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. हा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीचा मार्ग सोपा होणार आहे. या सामन्यानंतर भारताला बांगलादेशसोबत, तर श्रीलंकेला पाकिस्तानसोबत सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यानंतर बरंचसं चित्र स्पष्ट होणार आहे. भारताने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. पण श्रीलंकेचं होम ग्राऊंड असल्याने भारताला विजय वाटतो तितका सोपा नसेल हे देखील तितकंच खरं आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. पण सामन्यादरम्यान पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे सामना काही तासांसाठी थांबवावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, प्रेमदासा स्टेडियम फिरकीपटूंसाठी चांगलं असल्याचं गणलं जातं. पण भारताने याच मैदानात पाकिस्तान विरोधात 356 धावांची खेळी केली आहे. असं असलं तरी या मैदानात 260-280 धावा होऊ शकतात. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेणं पसंत केलं जाईल.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहील, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
श्रीलंकन टीम : पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, महीश थीकक्षाना, कसुन रजिथा, मथीशा पथिराना
भारत आणि श्रीलंकेतील महत्त्वाचे खेळाडू : पाथुम निस्सांका, कुसल मेंडिस, दासुन शानाका, महीश थीक्षाना, मथीशा पथिराना, रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह.
लकी इलेव्हन : कुसल मेंडिस (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, पाथुम निस्सांका, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, धनंजय डिसिल्वा, दासुन शानाका, जसप्रीत बुमराह, मथीशा पथिराना