AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 BAN vs HK Live Streaming : बांगलादेश या टीम विरुद्ध 11 वर्षांनंतर टी 20I मॅच खेळणार, सामना कुठे?

Asia cup 2025 Bangladesh vs Hong Kong Live Streaming : बांगलादेश क्रिकेट टीम आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. बांगलादेश या मोहिमेतील पहिल्या सामन्यात हाँगकाँग विरुद्ध 2 हात करणार आहे.

Asia cup 2025 BAN vs HK Live Streaming : बांगलादेश या टीम विरुद्ध 11 वर्षांनंतर टी 20I मॅच खेळणार, सामना कुठे?
Bangladesh CricketImage Credit source: AP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 11, 2025 | 12:14 AM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेची जोरदार सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात हाँगकाँग विरुद्ध 94 धावांच्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात यूएईवर 9 विकेट्सने मात केली. त्यानंतर आता बांगलादेश या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. हाँगकाँगचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. हाँगकाँगची स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली होती. त्यामुळे हाँगकाँगसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे. त्यामुळे हाँगकाँगसमोर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकण्याचं आव्हान आहे. तर बांगलादेश विजयी सुरुवात करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना केव्हा?

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना गुरुवारी 11 सप्टेंबरला होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना कुठे?

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपवरुन मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.

11 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमनेसामने

बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग यांच्यात 11 वर्षांआधी 2014 साली पहिलावहिला टी 20I सामना झाला होता. तेव्हा हाँगकाँगने बांगलादेशवर 2 विकेट्सने विजय मिळवला होता. ऑलराउंडर शाकिब अल हसन याने केलेल्या सर्वाधिक धावांच्या खेळीमुळे बांगलादेशला 100 पार मजल मारता आली होती. शाकिबने 34 धावांचं योगदान दिलं होतं. हाँगकाँगने बांगलादेशला 108 धावांवर रोखलं होतं. प्रत्युत्तरात हाँगकाँगने 8 विकेट्सच्या मोबदल्यात विजयी आव्हान पूर्ण करत बांगलादेशवर 2 विकेट्सने अविस्मरणीय असा विजय साकारला होता. त्यामुळे आता बांगलादेश या पराभवाची परतफेड करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे बांगलादेश गेल्या पराभवाचा हिशोब बरोबर करणार की हाँगकाँग सलग दुसरा विजय मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना