AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN Super 4 : श्रीलंका सलग चौथ्या विजयासाठी सज्ज, बांगलादेश साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करणार?

Sri Lanka vs Bangladesh, Super 4 Preview : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ आशिया कप 2025 स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.

SL vs BAN Super 4 : श्रीलंका सलग चौथ्या विजयासाठी सज्ज, बांगलादेश साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करणार?
SL vs BAN Super 4 PreviewImage Credit source: ACC Website
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 20, 2025 | 6:02 PM
Share

टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीला शनिवार 20 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात बी ग्रुपमधील संघ आमनेसामने असणार आहेत. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर लिटन दास बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.

श्रीलंका चौथ्या विजयासाठी सज्ज

साखळी फेरीप्रमाणे सुपर 4 मध्येही पात्र ठरलेल्या संघांना प्रत्येकी 3 सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले. श्रीलंकेने हाँगकाँग, बांगलादेशनंतर अफगाणिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने बी ग्रुपमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केल्याने बांगलादेशला सुपर 4 फेरीत प्रवेश मिळाला. श्रीलंकेने एकाप्रकारे बांगलादेशवर उपकारच केले. त्यामुळे बांगलादेश या उपकारांची जाणीव ठेवणार की साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

श्रीलंकेला रोखण्याचं आव्हान

श्रीलंकेला रोखण्याचं बांगलादेशसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. श्रीलंकेने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे श्रीलंका बांगलादेश विरुद्ध सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर बांगलादेशसमोर दुहेरी आव्हान असणार आहे. बांगलादेशसमोर साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करण्यासह सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करण्याचं आव्हान आहे.

साखळी फेरीत काय झालं होतं?

श्रीलंकेने बांगलादेशवर 13 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशने विजयसाठी दिलेलं 140 धावांचं आव्हान श्रीलंकेने 31 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं होतं.

सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात कोण करणार विजयी सुरुवात?

दोघांपैकी वरचढ कोण?

दरम्यान श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ टी 20i फॉर्मेटमध्ये एकूण 21 वेळा आमनेसामने आले आहेत.  श्रीलंकेने 21 पैकी सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे.  श्रीलंकेने बांगलादेश विरुद्ध  21 पैकी 13 टी 20i सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेश क्रिकेट टीमला 8 वेळा पलटवार करता आला आहे. त्यामुळे आता उभयसंघातील 22 व्या टी 20i सामन्यात कोण विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता