AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : शाहिन आफ्रिदीने रोहित-विराटला आऊट करत रचला इतिहास, ठरला पहिला गोलंदाज

IND vs PAK Asia Cup 2023 : रोहित आणि विराटने 140 कोटी जनतेचा हिरमोड केला. शाहिन आफ्रिदीने आपलं काम चोखपणे करत संघाला चांगली सुरूवात करून देत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 

IND vs PAK : शाहिन आफ्रिदीने रोहित-विराटला आऊट करत रचला इतिहास, ठरला पहिला गोलंदाज
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2023 | 6:39 PM
Share

मुंबई :  आशिया कप 2023  मधील भारत पाकिस्तानचा सामना सुरू असून टीम इंडिया बॅकफूटला ढकलली गेली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा परत एकदा स्वस्तात बाद झाले. पद्धतशीरपणे पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज शाहिन आफ्रिदीने दोघांनाही ट्रॅप लावत आऊट केलं.  आशिया कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे मुख्य खेळाडू अशा प्रकारे नांगी टाकली. रोहित आणि विराटने 140 कोटी जनतेचा हिरमोड केला. शाहिन आफ्रिदीने आपलं काम चोखपणे करत संघाला चांगली सुरूवात करून देत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

शाहिन आफ्रिदीने रचला इतिहास

शाहिन आफ्रिदीने एकाच वन डे सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना केलं. एकाच वन डे सामन्यामध्ये दोघांचीही विकेट घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा याने 22 बॉलमध्ये 11 धावा केल्या यामध्ये त्याने दोन चौकार मारले. तर कोहलीने 7 चेंडूत अवघ्या 4 धावा केल्या. कोहलीने चौकार मारत सुरूवात केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शाहिन आफ्रिदीने दोघांना आऊट करत टीम इंडियाला धक्यावर धक्के दिले.

श्रेयस अय्यर आल्यावर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत त्याने दोन चौकार मारले. अय्यर डाव सावरणार असं वाटलं होतं मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो कॅच आऊट झाला. शुबमन गिलसुद्धा सावध खेळला आणि बोल्ड आऊट झाला. आता मैदानात इशान किशन आणि हार्दिक पंड्याने जम बसवल्यासारखं दिसत आहे. इशान किशन अर्धशतक करून नाबाद आहे आणि त्याला हार्दिक पंड्याही साथ देत आहे.

पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Follow Us
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह