Asian Games 2023 Final मध्ये टीम इंडियासमोर श्रीलंका, कोण जिंकणार गोल्ड मेडल?

Asian Games 2023 India Women vs Sri Lanka Women Final | वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर उपांत्य फेरीत एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत रुबाबदार एन्ट्री घेतली. आता टीम इंडियाची नजर सुवर्ण पदक मिळवण्यावर आहे.

Asian Games 2023 Final मध्ये टीम इंडियासमोर श्रीलंका, कोण जिंकणार गोल्ड मेडल?
| Updated on: Sep 24, 2023 | 5:29 PM

बिजिंग | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने आतापर्यंत एशियन गेम्स 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केलीय.टीम इंडियाने रविवारी 24 सप्टेंबर रोजी पहिला सेमी फायनल सामना खेळला. टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये वूमन्स बांगलादेशचं आव्हान होतं. टीम इंडियाने बांगलादेशवर या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तसेच सिलवर मेडलही निश्चित केलं. टीम इंडियाचं आता गोल्डन मेडल मिळवण्याकडे लक्ष आहे. एशियन गेम्समधील क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना हा 25 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

सामन्याबाबत थोडक्यात पण सविस्तर

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामन्याचा सकाळी 6 वाजता टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन स्मृती मंधाना हीने बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन स्मृतीच्या फिल्डिंगचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. टीम इंडियाचे गोलंदाज बांगलादेशवर तुटून पडले. पूजा वस्त्राकर हीने बांगलादेशचं वस्त्रहरण केलं. टीम इंडियाने बांगलादेशला 17.5 ओव्हरमध्ये अवघ्या 51 धावांवर ऑलआऊट केलं. बांगलादेशकडून 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघं दुहेकी आकडाही गाठण्यात अपयशी ठरले. कॅप्टन निलगर सुल्ताना हीने सर्वाधिक 12 धावांची खेळी केली. तर नाहिदा अख्तर हीने नाबाद 9 धावा केल्या.

तर टीम इंडियाकडून पूजा वस्त्राकर हीने 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर तिटास साधू, अमनज्योत कौर, राजेश्वरी गायकवाड आणि देविका वैद्य या चौघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पूजा वस्त्राकर हीच्याकडून बांगलादेशचं वस्त्रहरण


त्यानंतर टीम इंडिया 52 धावांच्या आव्हानसाठी मैदानात आली. टीम इंडियाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. स्मृती मंधाना हीने 7 आणि शफाली वर्मा हीने 17 धावा केल्या. ही सलामी जोडी आऊट झाली. त्यानंतर भांडूपकर जेमिमाह रॉड्रिग्स आणि कानिका आहुजा या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाह हीने नाबाद 20 धावा केल्या. तर कानिकाने नाबाद 1 धाव केली. बांगलादेशकडून फहिमा खातून आणि मरुफा अक्तर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना

तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकाने पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकाने यासह फायनलमध्ये धडक दिली. आता अंतिम सामन्यात गोल्डन मेडलसाठी 25 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका असा महामुकाबला होणार आहे. या सामन्याला सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

वूमन्स टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, देविका वैद्य, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, कनिका आहुजा, अमनजोत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री, अंजली सरवानी, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, बारेडी अनुशा आणि पूजा वस्त्राकर.

वूमन्स श्रीलंका टीम | चमारी अथापथु (कॅप्टन), निलाक्षी डी सिल्वा, इमेशा दुलानी, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कौशली नुथ्यांगना, कविशा दिलहारी, ओशादी रणसिंघे, इनोशी प्रियदर्शनी, अचिनी कुलासुरिया, सुंगदीका कुमारी, उदेशिका प्रबोधिनि आणि इनोका रनिविरा.