AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतळ्याच्या अनावरणावेळी शरद पवार यांनी केलं मास्टर ब्लास्टर सचिनचं कौतुक, म्हणाले…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पूर्णकृती पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. हा पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये बसवण्यात आला आहे. यावेळी बीसीसीआयचे सदस्य आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी काही किस्से सांगितले.

पुतळ्याच्या अनावरणावेळी शरद पवार यांनी केलं मास्टर ब्लास्टर सचिनचं कौतुक, म्हणाले...
पुतळा अनावरण कार्यक्रमात शरद पवार यांनी सांगितला 'तो' किस्सा
| Updated on: Nov 01, 2023 | 8:09 PM
Share

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमासाटी स्वत: सचिन तेंडुलकर उपस्थित होता. या पुतळ्याच्या अनावरणावेळी पुन्हा एकदा सचिन..सचिन हा जयघोष उपस्थितांना ऐकायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याने सचिन तेंडुलकर याच्या कास्य धातुत तयार केलेल्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी सचिन तेंडुलकरचं पूर्ण कुटुंब, क्रीडामंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, एमसीए अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बीसीसीआयची धुरा असताना सचिन तेंडुलकरसोबत कसा संवाद व्हायचा? आणि त्यांनी कर्णधारपदासाठी कसं नाव सुचवलं? याबाबत शरद पवार यांनी सांगितलं.

“एक दिवस मी शिवाजी पार्कवर राउंड मारत होतो. तेव्हा एका मुलाला पाहिलं. तेव्हा मी त्याच्या प्रशिक्षकांना या मुलावर लक्ष ठेवायला सांगितलं. तो मुलगा म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याने पुढे जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं केलं. तेव्हापासून त्याने जी सुरुवात केली तेथून त्याने पाठी वळून पाहिलं नाही. यशाच्या इतक्या शिखरावर पोहोचूनही त्याचे पाय कायम जमिनीवर होते हे विशेष.”, सचिनचं असं कौतुक शरद पवार यांनी केलं.

वानखेडे स्टेडियमवरच सचिन तेंडुलकर याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यात त्याने 74 धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना 126 धावांनी जिंकला होता. याच मैदानात भारताने वनडे वर्ल्डकप 2011 चं जेतेपद जिंकलं होतं. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा वर्ल्डकप होता.

सचिन तेंडुलकर याने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 48.52 च्या सरासरीने 34,357 धावा केल्या. तसेच सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. यात 100 शतकं आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे. शतकांचं शतक ठोकणारा सचिन पहिला क्रिकेटपटू आहे. तसेच 201 गडी बाद केले आहेत. सचिन तेंडुलकर याने 2008 ते 2013 या कालावधीत मुंबई इंडियन्ससाठी 6 आयपीएल सिझन खेळले. यात 78 सामन्यात त्याने 34.84 च्या सरासरीने 2334 धावा केल्या. यात 13 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.