Alyssa Healy : एलिसा हीलीचा डबल धमाका, बांगलादेश विरुद्ध विक्रमी शतक, ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये

Alyssa Healy AUS vs BAN : कॅप्टन एलिसा हीली हीने टीम इंडिया विरुद्ध शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे भारताला 330 धावांनंतरही पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर एलिसाने बागंलादेश विरुद्धच्या सामन्यात सलग दुसरं शतक करत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पोहचवलंय.

Alyssa Healy : एलिसा हीलीचा डबल धमाका, बांगलादेश विरुद्ध विक्रमी शतक, ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये
Alyssa Healy Century
Image Credit source: Getty
| Updated on: Oct 16, 2025 | 10:31 PM

ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमची कॅप्टन आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. एलिसाने विशाखापट्टणममध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात वादळी आणि सलग दुसरं शतक ठोकलं. एलिसाने याआधी टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात 84 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्यानंतर एलिसाने बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या तुलनेत 11 बॉलआधी शतक पूर्ण केलं. एलिसाने अवघ्या 73 बॉलमध्ये शेकडा पूर्ण केला. एलिसाने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. एलिसाने केलेलं हे शतक या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरं वेगवान शतक ठरलं.

एलिसाचं वादळी शतक

एलिसाने या सामन्यात 77 बॉलमध्ये नॉट आऊट 113 रन्स केल्या. एलिसाने या खेळीत तब्बल 20 चौकार ठोकले. एलिसाने चौकारांच्या मदतीने एकूण 80 धावा केल्या. तर फोबी लीचफिल्ड हीने 72 चेंडूत नाबाद 84 धावांचं योगदान दिलं. या सलामी जोडीने 202 धावांची नाबाद भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने यासह वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण आठव्यांदा 10 विकेट्सने सामना जिंकण्याची कामगिरी केली. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला 199 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 24.5 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं.

एलिसा हीलीची विक्रमी कामगिरी

एलिसाने या सलग दुसऱ्या शतकासह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एलिसाचं वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण चौथं शतक ठरलं. तसेच एलिसा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकं करणारी ऑस्ट्रेलियाची पहिली फलंदाज ठरली. एलिसाने याबाबत करेन रोल्टन आणि मेग लॅनिंगचा विक्रम मोडीत काढला. या दोघींनी प्रत्येकी 3-3 शतकं झळकावली होती.

वेगवान शतकं करणाऱ्या महिला फलंदाज

डिएंड्रा डॉटीन, विरुद्ध पाकिस्तान, 71 चेंडू

एलिसा हीली, विरुद्ध बांगलादेश, 73 बॉल

नॅट सायव्हर ब्रँट, विरुद्ध पाकिस्तान, 76 बॉल

एलीसा हीलीची शतकी झंझावात

ऑस्ट्रेलियाची सेमी फायनलमध्ये धडक

दरम्यान ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत करत वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली. ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये 9 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.