
इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मोहिमेतील पहिल्याच सामन्यात धावांचा डोंगर उभारला आहे. बेन डकेट याने केलेल्या विक्रमी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 350 पार मजल मारली आहे. बेन डकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहास सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला आहे. डकेटने 165 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचं आव्हान ठेवण्यात यश आलं आहे. इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 351 धावा केल्या. आता विश्वविजेता ऑस्ट्रेलिया या विजयी आव्हानाचा कसा पाठलाग करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इंग्लंडसाठी बेन डकेट याने 143 बॉलमध्ये 115.38 च्या स्ट्राईक रेटने 165 रन्सची खेळी केली. डकेटने या खेळीत 3 सिक्स आणि 17 फोर लगावले. डकेटचं ही एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचं दुसरं शतक ठरलं. तसेच अनुभवी फंलदाज जो रुट याने 78 चेंडूत 68 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन जोस बटलर याने 23, जेमी स्मिथ 15, लियाम लिविंगस्टोन 14 आणि फिल सॉल्ट याने 10 धावा जोडल्या. तर अखेरीस जोफ्रा आर्चर याने नाबाद 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
तर ऑस्ट्रेलियाकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी फक्त चौघांनाच विकेट घेण्यात यश आलं. बेन द्वारशुइस याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. एडम झॅम्पा आणि मार्नस लबुशेन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल याने 1 विकेट घेतली. तर नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि मॅथ्यू शॉर्ट या तिघांना एकही विकेट घेता आली नाही.
ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचं आव्हान
ENGLAND POSTED 351 FOR 8 AGAINST AUSTRALIA IN CHAMPIONS TROPHY AT LAHORE 🔥 pic.twitter.com/6Cp8azAxug
— Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2025
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.