AUS vs IND : टीम इंडियाचं 185 धावांवर पॅकअप, पंत-बुमराहची झुंजार खेळी

Australia vs India 5th Test 1st Innings : टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशा केली आहे. टीम इंडिया पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात 185 धावांवर ऑलआऊट झाली.

AUS vs IND : टीम इंडियाचं 185 धावांवर पॅकअप, पंत-बुमराहची झुंजार खेळी
jasprit bumrah batting ind vs aus 5th test
| Updated on: Jan 03, 2025 | 12:27 PM

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 185 धावांवर ऑलआऊट झाली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 72.2 ओव्हरमध्ये रोखलं. टीम इंडियाच्या काही फलंदाजांचा अपवाद वगळता सर्वांनाच ठिकठाक सुरुवात मिळाली होती. मात्र त्यापैकी काहीच फलंदाजांना झुंज देता आली. तर इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. टीम इंडियाकडून ऋषभ पंत याने सर्वाधिक 40 धावा केल्या. पंतसह एकूण चौघांनाच 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार बुमराहने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताला ठराविक अंतराने झटके दिले. टीम इंडियासाठी पंतने 98 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह सर्वाधिक 40 रन्स केल्या. रवींद्र जडेजाने 95 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावा जोडल्या. शुबमन गिल याने 64 चेंडूत 20 धावा केल्या. तर अखेरीस कर्णधार बुमराहने 3 चौकार आणि 1 षटकारासह 17 बॉलमध्ये निर्णायक 22 धावा जोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला 150 पार मजल मारता आली.

तसेच विराट कोहली याने 17, वॉशिंग्टन सुंदर याने 14 आणि यशस्वी जयस्वालने 10 धावा केल्या. प्रसिध कृष्णा आणि केएल राहुल या दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर मेलबर्नमध्ये शतक करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याला भोपळाही फोडता आला नाही. नितीश गोल्डन डक ठरला. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बोलँड याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स याने 2 विकेट्स मिळवल्या. तर नॅथन लायनने एक विकेट मिळवली.

ऋषभ पंतची चिवट खेळी

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.