
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा करो या मरो असा सामना आहे. ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडिया विरुद्ध जिंकावं लागणार आहे. अशात मिचेल मार्शने प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मिचेलने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 पण मोठा बदल केलाय. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
कॅप्टन मिचेलने एश्टन एगर याला बाहेर ठेवलंय. तर त्याच्या जागी मिचेल स्टार्क या वेगवान आणि स्टार गोलंदाजाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. अशात टीम इंडियाच्या फंलदाजांना मिचेल स्टार्क आणि एकूणच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सांभाळून सामना करावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील हा सहावा सामना आहे. टीम इंडियाने याआधी 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
It’s the clash of the titans 💥
Australia have won the toss and elected to field first against India.#T20WorldCup | #AUSvIND | 📝: https://t.co/f1scOKtTA7 pic.twitter.com/xomBnyd6Op
— ICC (@ICC) June 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.