Funny Video : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जमतंच नाही! भर मैदानात पेपरसाठी अशी रंगली पकडापकडी

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुद्धचा पहिला कसोटी सामना 360 धावांनी जिंकला. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण या सामन्यात एक प्रसंग असा आला की ऑस्ट्रेलियन खेळाडूंची दमछाक झाली. एक पेपर पकडण्यासाठी चार खेळाडूंची धावपळ पाहून तुम्हीही हसाल.

Funny Video : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जमतंच नाही! भर मैदानात पेपरसाठी अशी रंगली पकडापकडी
AUS vs PAK : एक पेपरने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भर मैदानात तंगवलं, Video पाहून पोट धरून हसाल
| Updated on: Dec 18, 2023 | 3:19 PM
मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 360 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर आला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे. पुढच्या कसोटी सामन्यानंतर यात बरील उलथापालथ होईल यात शंका नाही. असं असताना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु असताना एक मजेशीर प्रसंगही घडला. एका पेपराने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चांगलीच दमछाक केली. पेपर पकडण्यासाठी धावपळ सुरु होती. पेपर काही केल्या हाती लागत नव्हता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हसत आहेत. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला तर नक्कीच हसाल यात शंका नाही. पाकिस्तान दुसऱ्या डावात 3 बाद 44 धावा असताना हा प्रसंग घडला. तेव्हा बाबर आझम 14 आणि शकील 6 धावांवर खेळत होता.
मैदानात एक पेपर उडत आल्याने खेळाडूंचं लक्ष विचलीत झालं. यासाठी मार्नस लाबुशेननं पेपर पकडण्यासाठी धाव घेतली. पण हवेच्या झोक्यामुळे पेपर पकडणं कठीण झालं. पेपर कधी इथे, तर कधी तिथे उडत होता. लाबुशेनची अडचण पाहून लियॉनने धाव घेतली. पण त्यालाही पेपर पकडता आला नाही. पेपर पकडण्यासाठी लियॉनला झुंझावं लागलं. मग उस्मान ख्वाजा तिथेला आला. जोशात पेपर पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही शक्य झालं नाही. अखेर स्टीव्ह स्मिथच्या पुढ्यात पेपर आला आणि त्याने तो पटकन पकडला. पेपर पकडल्याचा आनंद एखाद्या झेल पकडण्यापेक्षाही जास्त असल्याचं. त्यांच्या सेलिब्रेशनवरून दिसून आलं.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या डावात 487 धावा केल्या. त्यानंतर आलेला पाकिस्तानचा संघ 271 धावा करू शकला. तर दुसऱ्या डावात 233 धावा करत ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला आणि 449 धावांचं आव्हानं दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 89 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 360 धावांनी जिंकला. आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.