AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माला दिली गूड न्यूज! पाकिस्तानला पराभूत केल्याने भारताला असा झाला फायदा

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलं. पाकिस्तानच्या पराभवामुळे थेट भारताला फायदा झाला आहे. तर कसोटीतील तीन सामने जिंकूनही ऑस्ट्रेलियाचं मानांकनात काही सुधारणा होताना दिसत नाही. या क्षणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा झाली तर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत असतील.

WTC 2025 : ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माला दिली गूड न्यूज! पाकिस्तानला पराभूत केल्याने भारताला असा झाला फायदा
WTC 2025 : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्मासाठी आनंदाची बातमी, ऑस्ट्रेलियाकडून मिळालं मोठं गिफ्ट
| Updated on: Dec 17, 2023 | 2:50 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या अंतिम फेरीसाठी साखळी फेरीचे सामने सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी सामन्याचं महत्त्व आहे. कोण कसं जिंकतं इथपासून विजयी टक्केवारी खूपच महत्त्वाची ठरत आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पाकिस्तानच्या पराभवाचा थेट भारताला फायदा झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाला मानांकनात काहीच सुधारणा झालेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुणतालिका पाहता तुम्ही असंच म्हणाल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या सध्या गुणतालिकेत भारत आणि पाकिस्तान संयुक्तिकरित्या अव्वल स्थानी आहेत. तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी कमी असल्याने पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. पाकिस्तान आता अव्वल स्थानी कायम राहते की जाते हे दुसऱ्या कसोटीनंतर स्पष्ट होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला टॉप दोनमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुढील दोन्ही कसोटी जिंकणं गरजेचं आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली. एका सामना ड्रॉ झाला. त्यामुळे भारताची विजयी टक्केवारी 66.67 टक्के राहिली. तर पाकिस्तानने श्रीलंकेला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केल्याने विजयी टक्केवारी 100 होती. पण आता ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केल्याने त्यांच्या विजयी टक्केवारी परिणाम झाला आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारीही 66.67 टक्के आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संयुक्तिकरित्या अव्वल स्थानी आहेत.

WTC_2025 (1)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत न्यूझीलंड आणि बांगलादेष विजयी टक्केवारी 50 सह संयुक्तिरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. तर ऑस्ट्रेलिया एशेस मालिकेतील दोन पराभवांचा जबरदस्त फटका बसला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. तर एक सामना ड्रॉ करत वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ दोन विजय मिळवूनही विजयी टक्केवारी 15 सह सातव्या स्थानावर आहे.

श्रीलंकेला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. तर दक्षिण अफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील एकही सामना खेळलेला नाही. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेवर आता पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.