IND vs AUS : इंडिया-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीमला तगडा झटका, स्टार खेळाडू सर्व सामन्यांतून बाहेर, दुखापत महागात

India A vs Australia A : इंडिया ए टीम मायदेशात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी पाहुण्या संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्टार आणि युवा खेळाडूला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागणार आहे.

IND vs AUS : इंडिया-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीमला तगडा झटका, स्टार खेळाडू सर्व सामन्यांतून बाहेर, दुखापत महागात
India vs Australia
Image Credit source: AP
| Updated on: Sep 09, 2025 | 1:38 AM

इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यात भारतीय क्रिकेट संघाचा एकही सामना झाला नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. सप्टेंबर महिन्यात आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहेत. एकूण 8 संघ एका ट्रॉफीसाठी एकमेकांविरुद्ध 2 हात करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम आशिया कप स्पर्धेदरम्यान मायदेशात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भिडणार आहे. इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 4 दिवसांचे 2 सामने होणार आहेत. त्यानंतर 3 अनऑफिशियल वनडे सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया ए टीम या दोन्ही मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया ए टीमला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलिया ए टीमच्या युवा खेळाडूला दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.

ऑस्ट्रेलिया ए टीमचा वेगवान गोलंदाज कॅलम विल्डर याला स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. विल्डरआधी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंनाही दुखापतीमुळे मल्टी डे टेस्ट सीरिजमधून बाहेर व्हावं लागलंय. दुखापत झालेल्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, लान्स मॉरिस आणि ब्रॉडी काउच यांचा समावेश आहे.

कॅलम विल्डर याला नक्की काय झालं?

“कॅलम विल्डर याला सरावादरम्यान पाठीत त्रास जाणवू लागला. विल्डरने त्रास होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर विल्डरच्या आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. त्यात विल्डरला स्ट्रेस फॅक्चर असल्याचं समोर आलं. त्यामुळे विल्डरला पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ लागेल. विल्डर दुखापतीतून सावरल्यानंतर रिहबॅला सुरुवात करेल”, अशी माहिती ईसपीएन क्रिकइन्फोने क्विसलँडचे हाय परफॉर्मन्स अधिकारी जो डावेस यांच्या हवालव्याने दिली.

तसेच विल्डर व्यतिरिक मॉरिस आणि काउच या दोघांनाही दुखापतीमुळे मल्टी डे सीरिजमध्ये खेळता येणार नाहीय. मॉरिसला दुखापतीमुळे तब्बल 1 वर्ष क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. तर काउचला साईड स्ट्रेनमुळे बाहेर व्हावं लागलंय. काउच शेफील्ड शील्ड स्पर्धेपर्यंत फिट होईल, असं म्हटलं जात आहे.

2 मालिका आणि 5 सामने

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध इंडिया ए टीम यांच्यात 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान 4 दिवसांचे 2 सामने होणार आहेत. त्यानंतर उभयसंघात 3 अनऑफिशियल वनडे मॅचेस होणार आहेत. या मालिकेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने 4 दिवसांच्या 2 सामन्यांसाठी काही दिवसांपूर्वी इंडिया ए टीमची घोषणा करण्यात आली. श्रेयस अय्यर याच्याकडे इंडिया ए टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.