AUSW vs INDW : भारताच्या तिसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

Australia vs India Women 3rd T20i Live Streaming : भारतीय क्रिकेट चाहत्यांना शनिवारी 21 फेब्रुवारीला सुपर 8 फेरी दरम्यान वूमन्स टीम इंडियाच्या टी 20i सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जाणून घ्या भारताचा तिसरा टी 20i सामना किती वाजता सुरु होणार?

AUSW vs INDW : भारताच्या तिसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
Harmanpreet Kaur and Sophie Molineux AUS vs IND
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 20, 2026 | 11:08 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवट झाला आहे. ऑस्ट्रेलियाने  या स्पर्धेत साखळी फेरीतील 40 व्या आणि आपल्या मोहिमेतील शेवटच्या सामन्यात दुबळ्या ओमानवर 9 विकेट्सने विजय मिळवला. मिचेल मार्श याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 105 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह दुसरा विजय मिळवला. त्यानंतर आता 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची वुमन्स टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Women Tour Of Australia 2026) आहे. उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यातील या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हा कधी आणि कुठे होणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत सोडवली. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामन्यात चाहत्यांना चांगलीच चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना एडलेड ओव्हलमध्ये होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी नाणेफेकीचा कौल लागेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळणार का?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवर लाईव्ह पाहायला मिळेल.