
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 2 आशियाई संघ आमनेसामने आहेत. बांगलादेशने टीम इंडियाविरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मी पण फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेतला असता, असं रोहितने म्हटलं. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 झटके दिले. अनुभवी मोहम्मद शमी याने पहिल्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर बांगलादेशला पहिला झटका दिला. त्यानंतर हर्षित राणा याने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील वैयक्तिक पहिली विकेट घेतली. अशाप्रकारे सौम्य सरकार आणि कॅप्टन नजमुल हुसैन शांतो आले तसेच भोपळा न फोडताच माघारी परतले. त्यानंतर पुन्हा एकदा शमीने बांगलादेशला तिसरा धक्का दिला.
शमीने मेहदी हसन मिराजला शुबमन गिल याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे बांगलादेशची 3 बाद 26 अशी स्थिती झाली. त्यानंतर अक्षर पटेल याला हॅटट्रिक घेण्याची सुवर्णसंधी होती. मात्र कॅप्टन रोहित शर्मा याच्यामुळे एका चुकीमुळे अक्षरची ही संधी हुकली. रोहितने कॅच सोडल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे.
अक्षरने बांगलादेशच्या डावातील नवव्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर अनुक्रमे तांझिद हसन आणि मुशफिकुर रहीम या दोघांना आऊट केलं. त्यामुळे आता अक्षर हॅटट्रिकवर होता. स्ट्राईकवर झाकेर अली होता. अक्षरने चौथा बॉल टाकला. अक्षरने टाकलेला बॉल जाकेरच्या बॅटला लागून पहिल्या स्लीपमध्ये असलेल्या कॅप्टन रोहितच्या दिशेने गेला. मात्र रोहितला सोपा कॅच निट पकडता आला नाही. त्यामुळे अक्षरची हॅटट्रिक हुकली. रोहितने कॅच सोडल्याच्या संतापात जमिनीवर हाताने जोरात फटके मारत संताप व्यक्त केला. तसेच रोहितने त्यानंतर अक्षरची हात जोडून माफी मागितली.
रोहितची घोडचूक, अक्षरची हॅट्रिक हुकली
Rohit Sharma, what have you done? That was the hat-trick ball 😭
— 𝐒 𝐰 𝐚 𝐫 𝐚ᯓ (@SwaraMSDian) February 20, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.