
आयपीएल 2025 मध्ये 17 वर्षीय आयुष म्हात्रे आणि 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या 2 युवा फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. आयुषने मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या घरच्या मैदानात आयपीएल पदार्पण केलं. आयुषने पदार्पणात आपली छाप सोडली. तर दुसर्या बाजूला वैभवने 28 एप्रिलला आपल्या तिसऱ्याच सामन्यात शतक ठोकलं. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध 101 धावा केल्या. वैभव आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर आता क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयुष आणि वैभव या 2 युवा खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात जून ते ऑगस्ट दरम्यान कसोटी मालिका खेळणार आहे. सीनिअर टीम इंडियासह बीसीसीआय इंडिया ए आणि 19 वर्षांखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकते. अशाप्रकारे युवा खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अंडर 19 टीम इंडिया इंग्लंडमध्ये टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या 2 मालिकांसाठी वैभव आणि आयुष या दोघांना खेळण्याची संधी मिळू शकते. हे दोघे खेळाडू 19 वर्षांखालील श्रेणीत मोडतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 2 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी वैभव आणि आयुषची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या दोघांनीही गेल्या काही काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आयुष-वैभवला संधी मिळण्याची शक्यता
🚨 INDIA U-19 TEAM TO ENGLAND 🚨
Indian team will play 5 One-Day & 2 unofficial Tests in UK — Players like Vaibhav Suryavanshi, Ayush Mhatre set to get the opportunity. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/CACekK4udx
— Johns. (@CricCrazyJohns) April 29, 2025
एकदिवसीय मालिका
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोघे अंडर 19 टीम इंडियाचे सदस्य आहेत. वैभवने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतकही झळकावलं आहे. तसेच वैभव आणि आयुष हे दोघे अंडर 19 आशिया कप स्पर्धेतही सहभागी झाले आहेत. दोघेही टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज होते.